Rohit Sharma मुंबई इंडियन्सला टुल्ली देणार? IPL 2025 पूर्वी सूर्यालाही सोबत घेऊन जाणार

Rohit Sharma to leave Mumbai Indians - भारतीय संघात बदल पाहायला मिळाल्यानंतर आता आयपीएल फ्रँचायझींमध्येही खांदेपालट होताना दिसल्यास आश्चर्य वाटायला नको
Rohit Sharma to leave Mumbai Indians
Rohit Sharma to leave Mumbai Indianssakal
Updated on

Rohit Sharma to leave Mumbai Indians - गौतम गंभीर टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक बनल्यानंतर टीम इंडियामध्ये बदलाचे वारे वाहू लागले आहेत. या बदलेल्या वाऱ्यांचा मोर्चा आता इंडियन प्रीमिअर लीग ( IPL ) वळल्याचे दिसतोय... IPL 2025 साठी मेगा ऑक्शन होणार आहे आणि यापूर्वी अनेक खेळाडू इकडचे तिकडे झालेले पाहायला मिळतील. यात काही मोठी नावंही पाहायला मिळाली तर आश्चर्य वाटायला नको. पण, यात जर रोहित शर्मा ( Rohit Sharma) हे नाव असेल, तर सर्वांसाठी हा खूप मोठा धक्का असेल.

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जेतेपदाचा १७ वर्षांचा दुष्काळ संपवला. २००७ नंतर भारताने प्रथमच ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जिंकला. रोहितने त्यानंतर आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०तून निवृत्ती जाहीर केली आणि सूर्यकुमार यादवकडे भारताच्या ट्वेंटी-२० संघाचे नेतृत्व सोपवले गेले. रोहित आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० खेळणार नसला तरी आयपीएलमध्ये तो आणखी किमान २-३ वर्ष सहज खेळणार आहे. पण, तो मुंबई इंडियन्सच्या निळ्या जर्सीत दिसेल, ही शक्यता कमी आहे.

Rohit Sharma to leave Mumbai Indians
IPL 2025 मध्ये बदलाचे वारे! MS Dhoni निवृत्ती घेणार अन् चेन्नईत ऋषभ पंतची एन्ट्री होणार; पण ऋतुराजचं काय?

हार्दिक पांड्याकडे नेतृत्व दिल्याने नाराज?

MI फ्रँचायझीने हार्दिक पांड्याला गुजरात टायटन्सकडून पुन्हा आपल्या ताफ्यात आणले. मोठी रक्कम त्यासाठी मोजली गेली. इथपर्यंत ठिक होतं, परंतु त्यांनी रोहितच्या जागी त्याची कर्णधार म्हणून केलेली निवड कोणालाच आवडलेली नाही. हार्दिकला कॅप्टन केल्याने रोहित नाराज असल्याच्या चर्चा आयपीएल २०२३ मध्ये रंगल्या. त्यात रोहितची पत्नी रितिका सजदेह हिनेही संभ्रम निर्माण करणारी पोस्ट केली होती. त्यामुळे रोहित नाराज असल्याच्या चर्चांना बळ मिळाले.

Rohit Sharma to leave Mumbai Indians
Delhi Capitals: रिकी पाँटिंग अन् दिल्लीचे मार्ग झाले वेगळे, IPL 2025 साठी संघाला मिळणार नवा कोच

रोहित शर्मा IPL 2025 पूर्वी Mumbai Indians ची साथ सोडेल अशी चर्चा तेव्हापासून सुरू झाली होती आणि आता हाती आलेल्या वृत्ताने ही चर्चा बळावली आहे. आयपीएल २०२५ च्या मेगा ऑक्शनपूर्वी रोहित मुंबई इंडियन्सची साथ सोडणार असून तो नव्या संघाकडून खेळताना दिसेल. दैनिक जागणरने दिलेल्या वृत्तानुसार रोहित KKR कडून खेळू शकतो.. रोहितसह सूर्यकुमार यादवही MI ची साथ सोडण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त समोर येत आहे, पण तो रोहितसोबत KKR कडूनच खेळेल हे निश्चित नाही.

रोहित म्हणजे मुंबई इंडियन्स....

हार्दिकला कॅप्टन बनवल्यानंतर मुंबई इंडियन्सला चाहत्यांच्या रोषाचा सामना करावा लागला, त्यावरून रोहित म्हणजे MI हे स्पष्ट झाले. रोहितच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने ५ आयपीएल जेतेपद जिंकली. पण, मागील काही हंगामात त्याच्या नेतृत्वाखाली संघाला साजेशी कामगिरी करता आली नाही. त्यामुळेच हार्दिकला कॅप्टन बनवले गेले. रोहितने २५७ आयपीएल सामन्यांत २ शतकं व ४३ अर्धशतकांसह ६६२८ धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर आयपीएलमध्ये एक हॅटट्रिकही आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.