Mumbai Indians retained Rohit Sharma : पाचवेळच्या विजेत्या मुंबई इंडियन्सने इंडियन प्रीमिअर लीग २०२५ साठी रोहित शर्माला संघात कायम राखले. पण, मुंबई इंडियन्स फ्रँचायझीने प्रमुख खेळाडू रोहितपेक्षा जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या व सूर्यकुमार यादव यांना जास्त रक्कम दिली. रोहित हा MI चा चौथ्या क्रमांकाचा रिटेन खेळाडू होता. फ्रँचायझीने जसप्रीतला सर्वाधिक १८ कोटी रुपये दिले, तर सूर्या व पांड्याला प्रत्येकी १६.३५ कोटी रुपये दिले. रोहितला १६.३० कोटी रुपये मिळाले. तिलक वर्मा हा ८ कोटींत पाचवा रिटेन खेळाडू ठरला. पण, रोहितला चौथे स्थान का दिले गेले, यामागचे कारण ऐकून तुम्ही खरंच रोहितला मुंबईचा राजा म्हणाला...