Mumbai Indians ला धक्का! मोठा खेळाडू LSG च्या ताफ्यात दाखल होणार, आज अधिकृत घोषणेची शक्यता

IPL 2025 Retention: इंडियन प्रीमिअर लीग २०२५ साठीच्या हालचालींनी वेग पकडला आहे. १० फ्रँचायझींना किती खेळाडूंना कायम राखता येईल, याची लवकरच घोषणा होईल, परंतु आता प्रत्येक फ्रँचायझी आपापला डाव टाकायला लागले आहेत.
Sanjiv Goenka
Sanjiv Goenkaesakal
Updated on

LSG IPL 2025 Retention Mumbai Indians : इंडियन प्रीमिअर लीग २०२५ साठी नोव्हेंबर महिन्यात मेगा ऑक्शन होण्याची शक्यता आहे. BCCI सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला रिटेन्शन नियमांची घोषणा करणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार BCCI प्रत्येक फ्रँचायझींना किमान ६ खेळाडूंना ( RTM सह ) कायम राखण्याची परवानगी देणार आहे. पण, खेळाडूंना रिटेन करण्यासोबत प्रशिक्षक स्टाफमध्येही बदल पाहायला मिळत आहेत. गौतम गंभीरनंतर लखनौ सुपर जायंट्समधील त्याचे पद रिक्तच आहे.

लोकेश कर्णधारपदी नसणार?

लखनौ सुपर जायंट्सचे मालक संजीव गोएंका आणि कर्णधार लोकेश राहुल यांची कोलकाता येथे बैठक झाली. यामध्ये आगामी आयपीएलसाठी कोणत्या खेळाडूंना रिटेन केलं जाईल यावर चर्चा झाली. त्याचवेळी लोकेशने कर्णधारपदावर कायम राहण्याची इच्छा नसल्याचे गोएंका यांना सांगितल्याचे कळतेय. LSG लोकेशला फलंदाज म्हणून रिटेन करेल, तर कर्णधारपदाची माळ निकोलस पूरन किंवा कृणाल पांड्या यांच्यापैकी एकाच्या गळ्यात जाण्याची शक्यता आहे.

Sanjiv Goenka
IPL 2025 Auction: KL Rahul लखनौ सुपर जायंट्सची साथ सोडणार? अचानक घेतली मालक संजीव गोएंका यांची भेट

गौतम गंभीरची रिप्लेसमेंट...

गौतम गंभीरने लखनौ सुपर जायंट्सचे मेंटॉरपद सोडले आणि कोलकाता नाइट रायडर्सचा मुख्य प्रशिक्षक झाला. त्यानंतर आता तो टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक आहे. त्यामुळे LSG च्या ताफ्यात ही जागा रिक्त झाली आहे आणि त्यासाठी त्यांनी Mumbai Indians च्या मोठ्या खेळाडूची निवड केली आहे. आज संजीव गोएंका पत्रकार परिषदेत त्याबाबत घोषणा करण्याची शक्यता आहे.

LSG चा मेंटॉर म्हणून भारताचा माजी गोलंदाज झहीर खान याची निवड जवळपास पक्की झाली आहे. आयपीएल २०२४ पूर्वी त्याने KKR चे मुख्य प्रशिक्षकपद स्वीकारले. त्याच्या मार्गदर्शनाखाली कोलकाताने आयपीएल २०२४ चे जेतेपद पटकावले. आता तो टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक आहे. झहीर खान २०१८ ते २०२२ या कालावधीत मुंबई इंडियन्ससोबत होता. आता तो मुंबई इंडियन्स फ्रँचायझीचा global development प्रमुख आहे. त्याने MI सह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि दिल्ली डेअरडेव्हिल्सचेही प्रतिनिधित्व केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com