Mumbai Indians IPL 2025 Auction
Mumbai Indians IPL 2025 AuctionSAKAL

IPL 2025 Auction : मुंबई इंडियन्स हार्दिक पांड्याला सोडणार? तर रोहित-सूर्यासह 'या' 4 खेळाडूंना ठेवणार कायम

या वर्षाच्या अखेरीस आयपीएल 2025 साठी एक मेगा लिलाव होणार आहे. याआधी सर्व संघांना त्यांच्या कायम ठेवलेल्या खेळाडूंची यादी जाहीर करावी लागणार आहे. मुंबई कॅम्पमधून एक मोठी बातमी समोर येत आहे....
Published on

IPL 2025 Auction Updates : काही दिवसांपूर्वी बीसीसीआयच्या आयपीएल अधिकारी आणि संघ मालक यांच्यात बैठक झाली. या बैठकीला काही संघांचे मालक बीसीसीआय कार्यालयात उपस्थित होते. या बैठकीतून अनेक मोठ्या बातम्याही समोर आल्या. मात्र, यादरम्यान आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. ही बातमी मुंबई इंडियन्सच्या कॅम्पशी संबंधित आहे.

Mumbai Indians IPL 2025 Auction
Paris Olympic Manu Bhaker : मनूची नजर मेडलच्या हॅट्‌ट्रिकवर! ऐतिहासिक क्षण मिस करू नका; वेळ नोट करून घ्या

वृत्तांवर विश्वास ठेवला तर, मुंबई इंडियन्स त्यांचा कर्णधार हार्दिक पांड्याला सोडणार आहे. खरंतर, मुंबई इंडियन्सने आयपीएल 2024 पूर्वी हार्दिक पांड्याला पुन्हा आपल्या संघात सामील केले होते. तसेच फ्रँचायझीने रोहित शर्माकडून कर्णधारपद काढून त्याला दिले होते. पण संघ आश्चर्यकारक काहीही करू शकला नाही. आता मुंबई इंडियन्स हार्दिक पांड्याला सोडणार असल्याची बातमी आहे.

Mumbai Indians IPL 2025 Auction
Paris Olympic 2024 : जोकोव्हीच-अल्काराझ 'गोल्डन' मॅच! सर्बियन खेळाडू विम्बल्डनचा वचपा काढणार?

आयपीएलच्या नियमांनुसार दर तीन वर्षांनी मेगा लिलाव आयोजित केला जातो. यावेळी डिसेंबरमध्ये पुन्हा मेगा लिलाव होणार आहे. अशा परिस्थितीत सर्व 10 संघांना प्रत्येकी चार खेळाडूंना कायम ठेवण्याची परवानगी असेल. मात्र, यावेळी कायम ठेवलेल्या खेळाडूंची संख्या वाढू शकते, असेही वृत्त आहे. याबाबत बीसीसीआय किंवा आयपीएलने अद्याप काहीही सांगितलेले नाही. पण आता पाच खेळाडूंना कायम ठेवता येईल असा दावा अहवालात केला जात आहे.

Mumbai Indians IPL 2025 Auction
Who Is Imane Khelif : कोण आहे नेमकी इमाने खलिफ? जी Olympicमध्ये सापडली वादाच्या भोवऱ्यात

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई इंडियन्सला रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव आणि जसप्रीत बुमराह यांना कोणत्याही किंमतीत सोबत ठेवायचे आहे. अशा परिस्थितीत फ्रँचायझी हार्दिक पांड्याला सोडणार आहे. कारण सूर्यकुमार आता टी-20 फॉरमॅटमध्ये भारतीय संघाचा कर्णधार आहे. अशा परिस्थितीत फ्रँचायझी आपल्या संघाची कमान त्याच्याकडे सोपवू शकते. रोहितही सूर्याच्या नेतृत्वाखाली खेळण्यास सोयीस्कर असेल.

मुंबई इंडियन्स आयपीएल 2025 साठी सूर्यकुमार यादव, रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह आणि तिलक वर्मा यांना कायम ठेवू शकते, असे या अहवालात म्हटले जात आहे. फ्रँचायझीला आता नवीन संघ तयार करायचा आहे यात शंका नाही. अशा परिस्थितीत आगामी हंगामात संघात अनेक नवे खेळाडू पाहायला मिळू शकतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.