Gujarat Titans संघामधून मोठी अपडेट, भारताचा माजी यष्टीरक्षक होणार बॅटींग कोच

IPL Auction 2024 : आयपीएल २०२५ साठी गुजरात टायटन्स शुभमन गिल व मोहम्मद शमीला संघात कायम ठेवण्याची शक्यता आहे.
parthiv patel
parthiv patelesakal
Updated on

Gujarat Titans New Batting Coach Parthiv Patel : आगामी इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) रिटेंशनची अंतिम तारीख जवळ येत असून फ्रॅंचायझींमधील अंतर्गत घडामोडींनी वेग घेतला आहे. अशातच गुजरात टायटन्सच्या गोटातून एक मोठी बातमी समोर येत आहे. भारतीय माजी यष्टीरक्षक पार्थिव पटेल आगामी आयपीएल हंगामासाठी गुजरात टायटन्समध्ये फलंदाजी प्रशिक्षक म्हणून सामील होणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार पार्थिव पटेल गुजरातचा मुख्य प्रशिक्षक आशिष नेहराच्या नेतृत्वाखालील फलंदाजी प्रशिक्षक म्हणून जबाबदारी स्वीकारणार आहे.

२०२४ च्या आयपीएलमध्ये गॅरी कर्स्टन हे गुजरात टायटन्सचे मुख्य प्रशिक्षक म्हणून काम पाहत होते. पण, १९ मे २०२४ मध्ये कर्स्टन यांनी गुजरात टायटन्स सोडून पाकिस्तान क्रिकेट संघात मुख्य प्रशिक्षक म्हणून कार्यरत झाला. त्यामुळे गुजरात टायटन्समधील फलंदाजी प्रशिक्षकच्या रिक्तपदी पार्थिव पटेलची निवड करण्यात येणार आहे, अशी बातमी सुत्रांमार्फत समोर येत आहे.

parthiv patel
IPL 2025 Auction पूर्वी मुंबई इंडियन्सने खेळली मोठी खेळी; फ्रँचायझी वेगळीच डिल करण्याच्या प्रयत्नात...

डिसेंबर २०२० मध्ये सर्व प्रकारच्या क्रिकेट फॉरमॅटमधून निवृत्ती घेतल्यानंतर तो मुंबई इंडियन्समध्ये टॅलेंट स्काउट म्हणून सामील झाला. त्याचबरोबर तो आयपीएलमध्ये समालोचन करतानाही दिसतो.

गुजरात टायटन्सने आपल्या पहिल्याच आयपीएल हंगामात हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली विजेतेपद पटकावले. त्यानंतर २०२४ च्या आयपीएल हंगामात हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्स संघामध्ये गेला आणि मोहम्मद शमी दुखापतीमुळे संघातून बाहेर होता. त्यामुळे आयपीएल २०२४ हंगामात गुजरात टायटन्स संघाचा समतोल बिघडलेला पहायला मिळाला. त्यामुळे टायटन्सचे प्रशिक्षक संघाची विस्कटलेली घडी पुन्हा कशी पुर्वरत करतात हे पाहणे आता महत्वाचे ठरेल.

parthiv patel
IPL 2025 लिलाव रियाधमध्ये रंगणार अन् तारीखही ठरली? महत्त्वाचे अपडेट्स आले समोर

आयपीएल २०२५ रिटेंशन

आयपीएल २०२५ साठी संघात कायम राहणाऱ्या खेळाडूंमध्ये शुभमन गिल हा टायटन्सची पहिली पसंती असण्याची शक्यता आहे. कारण फ्रँचायझीने त्याला मागील हंगामात कर्णधारपदी नियुक्त केले होते. त्याचबरोबर वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला देखील टायटन्स संघात कायम ठेवण्याचा प्रयत्न करेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.