Shubman Gill शब्दाला जागला! राशिद खानसाठी त्याग केला; गुजरात टायटन्सचे 5 रिटेन खेळाडू

IPL 2025 Players Retention: गुजरात टायटन्सने इंडियन प्रीमियर लीगच्या 18 व्या हंगामासाठी देखील त्यांची रिटेंशन यादी जाहीर केली आहे. आयपीएल 2025 च्या मेगा लिलावापूर्वी त्यांनी नियमांनुसार ज्या खेळाडूंना कायम ठेवायचे होते त्यांची नावे जाहीर केली आहेत.
Shubman Gill
Shubman GillESakal
Updated on

Gujarat Titans Players Retention: आयपीएलमध्ये आल्यानंतर गुजरात टायटन्सने दणक्यात विजेतेपद पटकावले. त्यावेळी हार्दिक पांड्या कर्णधार होता. गेल्या वर्षी पांड्या निघून गेला आणि शुभमन गिल कर्णधार झाला. गिलच्या नेतृत्वाखालील या संघातील आगामी आयपीएल हंगामासाठी कायम ठेवण्याची यादी जाहीर करण्यात आली आहे. गुजरात संघात पाच खेळाडूंना कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. म्हणजे उर्वरित खेळाडूंना लिलावात जावे लागणार आहे.

शुभमन गिल, रशीद खान या खेळाडूंना गुजरात टायटन्समध्ये कायम ठेवण्याचा निर्णय आधीच विचारात घेतला होता. गुजरात टायटन्स फ्रँचायझीने त्यांच्या 5 निवडलेल्या विशेष खेळाडूंची नावे जाहीर केली आहेत. गुजरात टायटन्सने शुभमन गिल, राशिद खान, साई सुदर्शन, शाहरुख खान आणि राहुल तेवतिया यांना कायम ठेवले आहे. राशिद खानला सर्वाधिक 18 कोटी रुपये मिळाले आहेत तर शुभमन गिलला 16.5 कोटी रुपयांमध्ये कायम ठेवण्यात आले आहे. लिलावात उतरण्यासाठी गुजरात टायटन्सच्या पर्समध्ये 69 कोटी रुपये शिल्लक आहेत.

Shubman Gill
RCB Players Retention: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने तिघांनाच संघात कायम ठेवले, बाकींना डच्चू दिले!

गुजरात टायटन्स रिटेन्शन लिस्ट

शुभमन गिल- 16.5 कोटी

राशिद खान- 18 कोटी

साई सुदर्शन- 8.5 कोटी

शाहरुख खान- 4 कोटी

राहुल तेवतिया- 4 कोटी

गुजरात टायटन्स संघ या स्पर्धेतील सर्वात महागड्या फ्रँचायझींपैकी एक आहे. ज्याने आपल्या पहिल्या हंगामातच विजेतेपद जिंकून इतिहास रचला होता. तर सलग दुस-या हंगामात त्यांनी पुन्हा अंतिम फेरी गाठली जिथे चेन्नई सुपर किंग्जने त्यांचा पराभव करून विजेतेपद पटकावले. गेल्या वेळी, त्यांचे तिसरे सत्र काही खास नव्हते आणि युवा शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली खेळताना त्यांनी 14 पैकी केवळ 5 सामने जिंकून गुणतालिकेत 8 वे स्थान मिळविले आणि त्यांना प्लेऑफमध्येही स्थान मिळवता आले नाही. यावेळी लिलावासाठी त्यांची रणनीती काय आहे, हे नंतर कळेल, सध्या त्यांनी ते खेळाडू निवडले आहेत ज्यांना ते लिलावात किंवा इतर कोणत्याही संघात जाऊ देऊ इच्छित नाहीत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.