KL Rahul ने स्वतःच्या पायावर धोंडा मारला! 18 कोटीं नाकारले आता IPL Auction मध्ये तेवढेही मिळण्याचे वांदे

IPL 2025 Players Retention: लखनौ सुपर जायंट्सचे मालक संजीव गोयंका यांनी यापूर्वी केएल राहुलला 18 कोटी रुपये राखून ठेवण्याची ऑफर दिली होती. पण त्याने ही ऑफर नाकारली. त्याने मेगा ऑक्शनला जाण्याचा निर्णय घेतला. त्याच्या नकारामुळे संजीव गोयंका यांनी स्फोटक फलंदाज निकोलस पूरनची जागा घेण्याचा निर्णय घेतला आहे.
KL rahul
KL rahulesakal
Updated on

IPL 2025 Retention: लखनऊ सुपर जायंट्स त्यांचा कर्णधार केएल राहुल कायम ठेवणार नाही. अधिकृत यादी अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही, परंतु अनेक अहवालातून हे समोर आले आहे. त्याचबरोबर लखनौ सुपर जायंट्स यष्टीरक्षक फलंदाज निकोलस पुरनला 21 कोटी रुपयांमध्ये कायम ठेवू शकते. आता प्रश्न असा आहे की लखनौ सुपर जायंट्स त्यांच्या कर्णधाराला का सोडत आहे?

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.