IPL 2025 News : तब्बल २३, १८ अन् १४ कोटी! Sunrisers Hyderabad चे ३ खेळाडू ठरले, काव्या मारन एकावर पैशांची उधळण करणार

IPL 2025 retaintion - इंडियन प्रीमिअर लीग २०२५ च्या मेगा ऑक्शनच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. BCCI ने फ्रँचायझीला सहा खेळाडू रिटेन करण्याची मुभा दिली आहे. त्यामुळे आता चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
SRH IPL retaintion
SRH IPL retaintionesakal
Updated on

Sunrisers Hyderabad retain player list : गतवर्षी सनरायझर्स हैदराबाद संघाचा आयपीएल जेतेपदाचा घास थोडक्यात हिरावला गेला होता. संपूर्ण स्पर्धेत आक्रमक फटकेबाजीने विक्रमांमागून विक्रम रचणाऱ्या या संघाला IPL 2024 Final मध्ये कोलकाता नाइट रायडर्सकडून हार पत्करावी लागली. पण, आयपीएलचे मागील पर्व हे सनरायझर्स हैदराबादने गाजवले आणि आता ते पुढील पर्वासाठी कोणत्या सहा खेळाडूंना कायम राखतील याची उत्सुकता लागली आहे. espncricinfo ने दिलेल्या माहितीनुसार सनरायझर्स हैदराबादचे तीन रिटेन खेळाडू ठरले आहेत आणि त्यापैकी एकासाठी SRH तब्बल २३ कोटी रुपये मोजणार असल्याचे वृत्त आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.