Mumbai Indians Retention : रोहित कुठे जात नाहीए! मुंबई इंडियन्स Rohit Sharma ला रिटेन करणार, ४ खेळाडूंची नावं जवळपास निश्चित

IPL 2025 Retention : इंडियन प्रीमिअर लीगच्या पुढील पर्वासाठी संघांची रणनीती ठरली आहे आणि रिटेन्शन यादीतील नावे समोर येत आहेत.
Rohit Sharma IPL 2025 Retention
Rohit Sharma IPL 2025 Retentionesakal
Updated on

Mumbai Indians Retention list for IPL 2025 : इंडियन प्रीमिअर लीग २०२५ साठी पुढील महिन्यात मेगा ऑक्शन होणार आहे. सर्व फ्रँचायझींना त्यांच्या संघात ६ खेळाडूंना कायम राखण्यासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंतची मुदत दिली आहे. पण, सर्वांचे लक्ष मुंबई इंडियन्सच्या रिटेन्शन लिस्टकडे लागले आहे आणि समोर आलेल्या माहितीनुसार माजी कर्णधार रोहित शर्मा ( Rohit Sharma) हा कुठेही जात नाहीए... हार्दिक पांड्याला कर्णधार केल्यामुळे रोहित नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या आणि तो आयपीएल २०२५ मध्ये दुसऱ्या फ्रँचायझीकडून खेळेल अशी चर्चा रंगलेली. पण, रोहित MI सोबतच राहणार आहे आणि सोबत चार खेळाडूंची नावेही समोर आली आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.