IPL 2025 RETENTION RULES: ७५ कोटी, हवे तसे खर्च करा! SRH ने परफेक्ट कार्यक्रम केला, आता अन्य फ्रँचायझीचा ताप वाढला

IPL 2025 Retention SRH play's mind game : इंडियन प्रीमिअर लीग २०२५ च्या मेगा लिलावापूर्वी सर्व फ्रँचायझीला रिटेंशन लिस्ट जाहीर करायची आहे. ३१ ऑक्टोबर ही शेवटची तारीख आहे.
Kavya Maran IPL 2025
Kavya Maran IPL 2025esakal
Updated on

Indian Premier League 2025 Mega Auction : इंडियन प्रीमिअर लीग २०२५ च्या तयारीला आता हळूहळू जोर धरू लागला आहे. मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हे संघ कोणाला कायम ठेवतात याची उत्सुकता अन्य फ्रँचायझीपेक्षा इतरांना जास्त आहे. पण, हे कसलेले तीन संघ पत्ते शेवटी उघडतील. मात्र सनरायझर्स हैदराबादने मोठा डाव टाकला आहे. बीसीसीआयने संघात कायम राखण्यात येणाऱ्या पाच खेळाडूंसाठी १८, १४, ११, १८, १४ कोटी अशी विभागवारी केली होती. पण, SRH ने हा फॉर्म्युला २३, १८, १४ असा केला आहे... त्यामुळे आता अन्य फ्रँचायझीवर खेळाडूंना कायम राखण्यासाठी दडपण वाढले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.