IPL 2025: शिक्कामोर्तब? KL Rahul सोडणार लखनौची साथ अन् निकोलस पूरन - मयंक यादवसह 'हे' अनकॅप खेळाडू राहू शकतात संघात कायम

IPL 2025 Retention: आयपीएल २०२५ लिलावापूर्वी लखनौ सुपर जायंट्स संघात कोणकोणत्या खेळाडूंना रिटेन करू शकतात, याबाबत नवे रिपोर्ट्स समोर आले आहेत.
Lucknow Super Giants
Lucknow Super GiantsSakal
Updated on

Lucknow Super Giants: इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेआधी मेगा लिलाव होणार आहे. येत्या काही दिवसातच हा लिलाव होईल, पण त्यापूर्वी संघांना आपल्या संघात रिटेन केलेल्या खेळाडूंची नावं जाहीर करायची आहेत. रिटेन केलेल्या खेळाडूंची नावं जाहीर करण्याती ३१ ऑक्टोबर ही अंतिम तारीख आहे.

अशातच गेल्या रिपोर्ट्स समोर येत आहेत. लखनौ सुपर जायंट्स संघाबाबतही चर्चा होत आहे. लखनौ संघ कर्णधार केएल राहुलला संघात कायम करणार की नाही, हे देखील गुलदस्त्यात आले. खरंतर आयपीएल २०२४ नंतरच केएल राहुल लखनौ संघात कायम राहणार की याबाबत चर्चा होत आहेत.

केएल राहुलने गेल्या तीन हंगामात या संघाचे नेतृत्व केले आहे. त्याच्या नेतृत्वात लखनौने २०२२ आणि २०२३ आयपीएल हंगामात प्लेऑफमध्ये प्रवेश केला होता. परंतु, २०२४ हंगामात लखनौ संघ ७ व्या क्रमांकावर राहिला होता.

Lucknow Super Giants
IPL 2025 Retention : काव्या मारनची एक 'खेळी' अन् Rishabh Pant, KL Rahul, Shreyas Iyer सह बंडाला पेटली 'मंडळी'!
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.