Punjab Kings संघातील राडा चव्हाट्यावर; Preity Zintaची न्यायालयात धाव अन् उडाली खळबळ

Punjab Kings Preity Zinta Court : पंजाब किंग्सच्या प्रमोटर्समध्ये वाद सुरू असल्याचे वृत्त समोर येत आहे आणि एका प्रमोटरविरुद्ध प्रीती झिंटाने न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहे.
Preity zinta
Preity zintaesakal
Updated on

IPL 2025 trouble in Punjab Kings: इंडियन प्रीमिअर लीग २०२५ च्या पर्वाला सुरुवात होण्यापूर्वी पंजाब किंग्समध्ये वाद झाल्याचे वृत्त समोर येत आहेत. पंजाब किंग्सचे मालकी हक्क चार जणांकडे आहेत आणि त्यापैकी सर्वाधिक हक्क असलेले प्रवर्तक ( promoter) त्यांच्याकडे असलेले काही टक्के शेअर अज्ञात व्यक्तिला विकत असल्याचे वृत्त समोर आले आहे. याविरोधात प्रीती झिंटाने न्यायालयात धाव घेतली आहे. प्रीतिकडे पंजाब किंग्सचे २८ टक्के शेअर आहेत.

पंजाब किंग्स संघाचे मालकी हक्क KPH Dream Cricket Private Limited कंपनीकडे आहेत आणि त्याचे चार भागीदार आहेत. त्यापैकी एक बॉलिवूड अभिनेत्री प्रीती झिंटा आहे, जिच्याकडे २३ टक्के शेअर आहेत. चंदीगढ मधून आलेल्या वृत्तानुसार प्रीतिने PBKS चे सहमालक मोहीत बर्मन यांच्याविरोधात राज्य उच्च न्यायालयात दाद मागितली आहे. बर्मन हे त्यांच्याकडे असलेल्या शेअरपैकी काही भाग हा अन्य कोणाला तरी विकत आहेत आणि त्यांच्याविरोधात प्रतिबंधात्मक आदेश द्यावा, अशी प्रीतीची मागणी आहे.

Preity zinta
MS Dhoni साठी काय पण! BCCI आयपीएलचा जुना नियम पुन्हा आणण्याच्या तयारीत, अन्य फ्रँचायझींचा विरोध

महत्त्वाचे म्हणजे बर्मन यांच्याकडे KPH Dream Cricket Private Limited चे सर्वाधिक ४८ टक्के शेअर्स आहेत. नेस वाडिया हे तिसरे मालक आहेत आणि त्यांच्याकडे २३ टक्के, तर उर्वरित शेअर्स हे करण पॉल यांच्या नावावर आहेत.

प्रीतिच्या न्यायालयीन अपीलमध्ये बर्मनच्या शेअर्सचा काही भाग विकण्याच्या कथित योजनांबद्दल चिंता आहे, जी त्यांनी नाकारली. डाबर कंपनीशी संबंधित असलेले बर्मन यांनी शुक्रवारी क्रिकबझला सांगितले की,"शेअर्स विकण्याचा माझा कोणताही विचार नाही." तथापि, बर्मन यांचा ११.५ टक्के शेअर्स अज्ञात व्यक्तिला विकण्याचा मानस असल्याचे अहवालात म्हटले आहे.

ट्रिब्यूनमधील एका अहवालात म्हटले आहे: "प्रीती झिंटाने सांगितले की बर्मन यांच्याकडे अंदाजे ४८ टक्के शेअरहोल्डिंग आहे आणि ते संचालक मंडळावर देखील आहेत. तिने मध्यस्थी आणि सामंजस्य कायदा-१९९६ च्या कलम ९ अंतर्गत याचिका दाखल केली आहे."

मालकांमधील अंतर्गत व्यवस्थेनुसार, विक्रीसाठी असलेला कोणताही हिस्सा आधी प्रवर्तकांच्या विद्यमान गटाला ऑफर करणे आवश्यक आहे, असल्याचे प्रीतीचे म्हणणे आहे. सध्याच्या प्रवर्तकांनी तो खरेदी करण्यास नकार दिल्यावरच तो भाग बाहेरील पक्षाला विकला जाऊ शकतो.

Preity zinta
IPL 2025 मध्ये 84 मॅच अन् रोहित, विराट यांनी सुचवलेला बदल! जय शाह यांची माहिती

बर्मन यांनी त्यांचे शेअर्स विकण्याची कोणतीही योजना स्पष्टपणे नाकारल्यामुळे, या प्रकरणाचे भविष्य अनिश्चित राहिले आहे. या प्रकरणाची सुनावणी २० ऑगस्ट रोजी होणार आहे. २०२२ मध्ये आयपीएलमध्ये दोन नवीन संघांचा समावेश झाल्यापासून, फ्रँचायझींच्या मूल्यांकनात लक्षणीय वाढ झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.