IPL 2025 mega auction host: इंडियन प्रीमिअर लीग २०२५ साठी येत्या २४-२५ नोव्हेंबरला रियाध येथे मेगा ऑक्शन होणार आहे. सर्व १० फ्रँचायझींनी त्यांच्या रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी IPL कडे सोपवली. संघांनी एकूण ४६ खेळाडूंना कायम ठेवले असून, एकूण ५५८.५ कोटी रुपये त्यासाठी खर्च केले गेले आहेत. आता उर्वरित २०४ खेळाडूंसाठी फ्रँचायझीकडे ६४१.५ कोटीच शिल्लक राहिले आहेत.PBKS ने दोन खेळाडूंना कायम राखून खिशात मेगा ऑक्शनसाठी ११०.५ कोटी राखून ठेवले आहेत. मेगा ऑक्शनमध्ये बरीच मोठी नावं दिसणार आहेत आणि त्यामुळे ऑक्शनमध्ये जोरदार रस्सीखेच पाहायला मिळणार आहे.