R Ashwin and Rachin Ravindra at IPL Auction 2025: इंडियन प्रीमियर लीग २०२५ लिलावात सुरुवातीपासून सर्व संघांमध्ये चुरस पाहायला मिळत आहे. सुरुवातीलाच कोट्यवधी रुपयांच्या बोली लागल्या आहेत.
आयपीएलच्या इतिहासातील सर्वाच्च बोलीही पहिल्या तासाभरातच लागल्या. श्रेयस अय्यरसाठी पंजाब किंग्सने २६ कोटींहून अधिकची किंमत मोजली, तर ऋषभ पंतसाठी २७ कोटी रुपये लखनौ सुपर जायंट्स संघाने मोजले. यानंतरही केएल राहुल, कागिसो रबाडा यांनाही मोठ्या बोली लागल्या.