IPL 2025 Auction : ऋषभ पंत CSK च्या ताफ्यात जातोय? Delhi Capitals ने जाहीर केली रणनीती

IPL Auction 2025 Retaintion : ऋषभ पंतने बांगलादेशविरुद्धच्या कसोटीत शतक झळकावले आणि इंडियन प्रीमिअर लीग २०२५ साठी बीसीसीआय लवकरच रिटेंशन नियम जाहीर करण्याची शक्यता आहे.
Rishabh Pant
Rishabh Pant esakal
Updated on

Rishabh Pant will play for CSK in IPL 2025? इंडियन प्रीमिअर लीग २०२५ च्या पर्वात सर्व फ्रँचायझींमध्ये बदल पाहायला मिळणार आहे. BCCI आयपीएल २०२५ साठी मेगा ऑक्शन घेण्याच्या तयारीत आहेत आणि त्यासाठी लवकरच रिटेशन नियमांची घोषणा होऊ शकते. Rishabh Pant आगामी आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्सकडून खेळताना दिसण्याची जोरदार चर्चा आहे आणि आज कसोटीत शतक झळकावल्यानंतर पुन्हा या चर्चेला सुरुवात झाली आहे. त्यात Delhi Capitals च्या ताफ्यातून मोठी बातमी समोर आली आहे.

ऋषभ पंतला दिल्ली कॅपिटल्सने संघात कायम ठेवण्यासाठी पूर्ण तयारी केली आहे आणि सर्व अफवांना पूर्णविराम लागला आहे. चेन्नई कसोटीत २६ वर्षीय यष्टीरक्षक-फलंदाजाने शानदार शतक झळकावले आणि DC ने ऋषभला कायम राखण्याचा निर्णय घेऊन टाकला. पंत आणि कॅपिटल्सच्या व्यवस्थापनामध्ये रिटेंशन फीबाबत मतभेद असल्याच्या अफवांनाही पूर्णविराम लागला.

Rishabh Pant
IND vs BAN 1st Test : 'भाई, इधर एक फिल्डर आएगा...'; Rishabh Pant ने बांगलादेशची फिल्डिंग सेट केली Video Viral

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने अद्याप संघात किती खेळाडूंना कायम ठेवता येईल, याबाबतचे नियम जाहीर केलेले नाहीत. पण, दिल्ली कॅपिटल्सच्या सूत्रांनी क्रिकबझला दिलेल्या माहितीनुसार फ्रँचायझी ऋषभला संघात कायम ठेवणार आहे. पंत आणि सहमालक पार्थ जिंदाल यांच्यात मुंबईत नुकत्याच झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला. पंतला आयपीएलमध्ये सध्या १६ कोटी फ्रँचायझीकडून मिळतातत आणि पुढील पर्वात त्यात वाढ होण्याची शक्यता आहे.

Rishabh Pant
IND vs BAN: वेलकम बॅक Rishabh Pant! वादळी शतक पाहून स्टेडियममधील आज्जीही भारावल्या, पाहा Video

पाच खेळाडू कोण?

BCCI ने जर पाच खेळाडूंना रिटेन करण्याची मुभा दिली तर ऋषभ हा त्यांची पहिली पसंती दर्शवली आहे. BCCI ने पाचपेक्षा जास्त खेळाडूंना कायम ठेवण्याची परवानगी दिल्यास दिल्ली अक्षर पटेल, कुलदीप यादव, जॅक फ्रेझर-मॅकगर्क व त्रिस्तान स्तब्स यांना कायम राखण्याच्या तयारीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.