IPL Brand Value : तब्बल 1 लाख 35 हजार कोटी! आयपीएल व्यावसायिक मुल्य 6.5 टक्क्यांनी वाढले

IPL Brand Value : तब्बल 1 लाख 35 हजार कोटी! आयपीएल व्यावसायिक मुल्य 6.5 टक्क्यांनी वाढले
Updated on

IPL Brand Value : आयपीएल 2024 मध्ये कोलकाता नाईट रायडर्सने विजेतेपद पटकावले. शाहरूख खान या फ्रेंचायजीचा मालक असून या संघानं तिसऱ्यांदा आयपीएलवर आपलं नाव कोरलं. गेल्या काही वर्षापासून आयपीएलची व्यावसायिक मुल्य चांगलंच वाढलं आहे.

हौलीहान लॉकी या ग्लोबल इनव्हेस्टमेंट बँकेने आपल्या मागील आहवालात आयपीएलचे व्यासायिक मुल्य हे 6.5 टक्क्यांनी वाढलं असल्याचं सांगितले. तर ब्रँड व्हॅल्यू ही 6.3 टक्क्यांनी वाढली आहे. विशेष म्हणजे या अहवालात आयपीएलमधील फ्रेंचायजींच्या ब्रँड व्हॅल्यूची देखील माहिती दिली आहे. यात मुंबई इंडियन्स किंवा आरसीबी या स्टार संघाची ब्रँड व्हॅल्यू जास्त असेल असं वाटतं मात्र तसं नाहीये.

IPL Brand Value : तब्बल 1 लाख 35 हजार कोटी! आयपीएल व्यावसायिक मुल्य 6.5 टक्क्यांनी वाढले
Ind Vs Pak T20 WC24 : बुमराह ठरला पाकिस्तानचा कर्दनकाळ! भारतानं 119 धावा डिफेंड करत पाकिस्तानचं केलं जवळपास पॅक अप

बँकेच्या प्रेस रिलीजमध्ये सांगण्यात आलं आहे की, 'हौलीहान लॉकी इंडियाने आज आयपीएल 2024 च्या ब्रँड व्हॅल्यूबाबतचा अभ्यास प्रकाशित केला आहे. हा आयपीएलच्या व्यावसायिक आणि ब्रँड व्हॅल्यूचा सखोल अभ्यास आहे.'

बँकेच्या अहवालानुसार, 'आयपीएलचे व्यावसायिक मुल्य हे 16.4 बिलियन युएस डॉलरपर्यंत पोहचले आहे. हे मुल्य गेल्या वर्षीच्या तुलनेत 6.5 टक्क्यांनी वाढले. भारतीय रूपयात याचे मुल्य 1 लाख 35 हजार कोटींच्या जवळ पोहचते. यावरून आयपीएलची जागतिक स्तरावरील वाढती ताकद दिसून येते. याचबरोबर आयपीएलची ब्रँड व्हॅल्यू देखील 6.3 टक्क्यांनी वाढली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत ती 3.4 बिलियन डॉलर म्हणजे 28 हजार कोटींपर्यंत पोहचली आहे.

IPL Brand Value : तब्बल 1 लाख 35 हजार कोटी! आयपीएल व्यावसायिक मुल्य 6.5 टक्क्यांनी वाढले
Babar Azam : बाबर आझमने छोट्या फॅनला केलं खूश; संजना गणेशननं सांगितलं नेमकं काय घडलं

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.