IPL 2024 Schedule Arun Dhumal Statement : आयपीएल चेअरमन अरूण धुमल यांनी आयपीएल 2024 चा हंगाम हा भारतातच खेळवण्यात येईल असं आश्वासन दिलं आहे. लोकसभा निवडणूक आणि आयपीएल 2024 हंगाम एकाचवेळी होणार आहे. त्यामुळे आयपीएलचा हंगाम नेहमीप्रमाणे भारताबाहेर हलवण्यात येईल अशी चर्चा रंगली होती. मात्र बीसीसीआयने संपूर्ण स्पर्धा भारतातच खेळवण्याबाबत कंबर कसली आहे. ते लोकसभेचा निवणूक कार्यक्रम जाहीर होण्याची वाट पाहत आहेत.
आयपीएलचे चेअरमन अरूण धुमल यांनी आयएएलएस वृत्तसंस्थेला मुलाखत दिली. त्यावेळी ते बोलताना म्हणाले की, 'आम्ही याबाबत भारत सरकार आणि विविध खात्यांसोबत काम करत आहोत. आमचा प्रयत्न हा आयपीएल भारतातच खेळवण्याचा आहे.'
'आम्ही निवडणूक आयोग लोकसभेचा निवडणूक कार्यक्रम कधी जाहीर करतो याची वाट पाहत आहोत जेणेकरून आम्हाला त्या पद्धतीने आमचं प्लॅनिंग करता येईल. निवडणूक कोणत्या राज्यात होणार आहे ते पाहून सामने कोणत्या राज्यात आयोजित करायच्या हे ठरवलं जाईल.'
धुमल पुढे म्हणाले की, 'आयपीएल मार्चच्या अखेरीस सुरू होण्याची शक्यता आहे. लोकसभेच्या निवडणुका या एप्रिल महिन्यात होण्याची शक्यता आहे. सरकारच्या मदतीने आम्ही यातून तोडगा काढू.'
स्थानिक पोलिसांच्या संरक्षणासाठी निवडणूक आयोगाच्या निर्णयाकडे बीसीसीआयचे लक्ष लागून राहिले आहे. राज्याच्या पोलिसांद्वारे आयपीएल सामन्यासाठी सुरक्षा पुरवली जाते. मात्र जर निवडणूक असेल तर पोलिसांना निवडणुकीसंदर्भातील ड्युटी असतात. त्यामुळे ते आयपीएलसाठी उपलब्ध राहू शकत नाही. त्यामुळे जर बीसीसीआयला आयपीएल भारतातच घ्यायची असेल तर त्यांना काळजीपूर्वक नियोजन करावं लागेल. मतदानाच्या दिवशी किंवा त्याच्या आधी आणि नंतर आयपीएलचा कोणताही सामना आयोजित करण्यात अडचणी येतील.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.