IPL Mega Auction 2025: गुजरात टायटन्सने ऑक्शनपूर्वीच Mumbai Indians चा माणूस फोडला; दिली मोठी जबाबदारी

IPL Mega Auction 2025: इंडियन प्रीमिअर लीग २०२५ च्या मेगा ऑक्शनपूर्वी गुजरात टायनटन्सने मोठा खेळाडू आपल्या ताफ्यात घेतला आहे.
Parthiv Patel
Parthiv Patelesakal
Updated on

IPL Mega Auction 2025: इंडियन प्रीमिअर लीग २०२५ च्या मेगा ऑक्शनपूर्वी गुजरात टायनटन्सने मोठा खेळाडू आपल्या ताफ्यात घेतला आहे. आयपीएल २०२२मध्ये चॅम्पियन ठरलेल्या गुजरात टायटन्सने लिलावापूर्वी पार्थिव पटेल याची फलंदाजी आणि सहाय्यक प्रशिक्षक म्हणून निवड केल्याचे जाहीर केले आहे. पार्थिवने टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक गॅरी कर्स्टन यांची जागा घेतली आहे. कर्स्टन यांनी पाकिस्तानच्या मर्यादित संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती केल्यानंतर फ्रँचायझी सोडली होती. पार्थिव पटेल मुंबई इंडियन्सच्या टॅलेंट स्काउटचा प्रमुख सदस्य होता. भारताच्या माजी यष्टिरक्षक-फलंदाजाचे स्वागत करताना गुजरात फ्रँचायझीला आनंद झाला आणि त्याचे स्वागत केले. जेद्दाह येथे २४ आणि २५ नोव्हेंबर रोजी आयपीएल मेगा ऑक्शन होणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.