''IPL मध्ये याला १३० रुपयांतही फ्रँचायझी घेणार नाही''; Babar Azam ची इज्जतच काढली राव

Pakistan vs Bangladesh : पाकिस्तानला कसोटी मालिकेत घरच्या मैदानावर बांगलादेशकडून २-० असा पराभव पत्करावा लागला आणि त्यानंतर त्यांच्यावर टीका होताना दिसतेय.
Babar azam
Babar azamesakal
Updated on

Pakistan Cricket Team : पाकिस्तान क्रिकेट संघाची आंतरराष्ट्रीय स्तरावर नाचक्की झाली आहे. बांगलादेशकडून त्यांना कसोटी मालिकेत २-० असा लाजीरवाणा पराभव पत्करावा लागला आहे. मार्च २०२१ पासून त्यांना घरच्या मैदानावर एकही कसोटी मालिका जिंकता आलेली नाही. यापूर्वी इंग्लंडने त्यांना त्यांच्याच घरी ३-० असे धुतले होते. पाकिस्तानच्या या पराभवानंतर त्यांच्यावर जोरदार टीका होताना दिसतेय. माजी खेळाडूंनी संघ व्यवस्थापन अन् निवड प्रक्रियेवरच बोट ठेवले आहे.

माजी कर्णधार बाबर आझम याचा फॉर्म हा या पराभवामागे चर्चेचा विषय ठरलेला दिसतोय. बांगलादेशविरुद्धही त्याला अपयश आले आणि टीकाकारांनी टीकेचे शस्त्र उगारले. बाबर आझमला ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२४मध्येही चमक दाखवता आली नव्हती. त्यानंतर बांगलादेशविरुद्धही तो अपेक्षांवर खरा नाही उतरला. त्याच्या कौशल्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.

Babar azam
PAK vs BAN : १३०३ दिवस झाले, पाकिस्तानला घरच्या मैदानावर जिंकता नाही आले!

बाबर आझमला सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे आणि अशात पाकिस्तानी यूट्यूबरनेही त्याला नाही सोडले. पाकिस्तानच्या माजी कर्णधाराला १३० रुपयांतही इंडियन प्रीमिअर लीगमधील एकही फ्रँचायझी घेणार नाही, अशी टीका त्याने केली आहे.

दरम्यान, कर्णधार शान मसूदने या पराभवाची जबाबदारी स्वीकारली आहे. तो म्हणाला, या पराभवाची मी जबाबदारी घेतो आणि देशाची माफी मागतो. पण, कसोटी क्रिकेटमधील कामगिरीत सुधारणा कशी करता येईल, यावर लक्ष केंद्रीत करायला हवं. मालिका हरण्याचं मी कारण देत नाही आणि मी त्याचा स्वीकार करतो. पण, खेळाडूंनीही ते मान्य करायला हवं.''

RCB ने पाकिस्तान क्रिकेट संघाची उडवली खिल्ली

पाकिस्तानच्या या पराभवाची रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनेही सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत खिल्ली उडवली आहे. RCB ने भारतीय संघाचा फोटो पोस्ट करत म्हटले की," घरच्या मैदानावर जिंकणे इतके सोपे नाही. पण भारतीय संघासाठी ते अवघड नाही आणि भारतीय संघ या महिन्यात पुन्हा खेळण्यासाठी मैदानावरती उतरणार आहे."

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.