IPL Player Auctions 2025 : इंडियन प्रीमिअर लीगच्या पुढील पर्वापूर्वी होणाऱ्या मेगा लिलावासाठी BCCI चा मास्टर प्लान तयार झाला आहे. Mega auction साठी बीसीसीआयचे नियम काय असतील याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. पण ते चित्र आता जवळपास स्पष्ट झालं आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) आयपीएल फ्रँचायझीला लिलावात मॅच टू मॅच पर्याय देणार नाही. त्यामुळे प्रत्येक फ्रँचायझीला पाच खेळाडूंना कायम ठेवण्याची परवानगी मिळण्याची शक्यता आहे.
नुकत्याच झालेल्या बैठकीत, BCCI ने सर्व १० संघ मालकांशी खेळाडू रिटेनरशिपबद्दल चर्चा केली. त्यांच्यापैकी बहुतेकांना 5-6 खेळाडूंना कायम ठेवायचे होते कारण यामुळे त्यांना संघात सातत्य राखता येणार आहे. बीसीसीआयने ही विनंती मान्य केल्याचे समजते आहे. पाच खेळाडूंना कायम ठेवल्याने फ्रँचायझींचे ब्रँड मूल्य देखील संरक्षित केले जाईल.
२०२२ च्या हंगामापूर्वी, जेव्हा फ्रँचायझींना जास्तीत जास्त चार खेळाडू ठेवण्याची परवानगी होती, तेव्हा तीनपेक्षा जास्त भारतीय आणि दोन परदेशी खेळाडूंना कायम ठेवू नये असे बंधन होते. पण यावेळी प्रत्येक फ्रँचायझीने किती परदेशी खेळाडूंना कायम ठेवता येईल याबाबत अद्याप कोणतीही स्पष्टता नाही.
पाच खेळाडूंना कायम ठेवण्याचा अर्थ, मुंबई इंडियन्ससाठी रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्या यांना कायम ठेवू शकते. पाच खेळाडूंना कायम ठेवण्याची शक्यता असल्याने सर्वांच्या नजरा आता मुंबई इंडियन्सवर आहेत. पांड्याच्या नेतृत्वाखाली यंदाच्या अत्यंत खराब हंगामानंतर ते त्यांच्या संघाची बांधणी कशी करतात याची उत्सुकता आहे.
आगामी लिलावासाठी बीसीसीआय रिटेंशन कॉस्ट किती ठेवेल हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. २०२२ मध्ये मुंबईने चार खेळाडूंना रिटेन केले, तेव्हा रोहितला सर्वाधिक १६ कोटी रुपये वेतन मिळाले, त्यानंतर बुमराह ( १२ कोटी), सूर्यकुमार ( ८ कोटी) आणि किरॉन पोलार्ड ( ६ कोटी ) हे खेळाडू होते. यावेळी कोणाला किती किंमत मिळते हे मजेशीर असेल.
बैठकीदरम्यान बहुतेक फ्रँचायझींना मेगा लिलाव नको हवा होता. त्यांना चार किंवा पाच वर्षांसाठी एक संघ कायम राखायचा होता. कोलकाता नाइट रायडर्सचा सह-मालक शाहरुख खान या वर्षी मेगा लिलाव न करण्याच्या बाजूने होते. केकेआर व्यतिरिक्त, मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्ज, सनरायझर्स हैदराबाद, राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स देखील मेगा लिलावासाठी अनुकूल नव्हते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.