MI IPL Retention 2025: मागच्या आयपीएल हंगामात रोहित शर्माला डावलून हार्दिक पांड्याला कर्णधार केल्यामुळे मुंबई इंडियन्स संघात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर मुंबई संघाच्या आयपीएल २०२५ रिटेंशनबाबत अनेक तर्क-वितर्क मांडले गेले. रोहित शर्मा संघ सोडेल अशाही बातम्या समोर येत होत्या. पण, मुंबईने काल आयपीएल २०२५ साठी संघात कायम ठेवलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली आणि सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. मुंबईने महत्वाच्या ५ खेळाडूंना संघात कायम ठेवले. पण फ्रॅंचायझीने इशान किशनला रिटेन केले नाही.
मुंबईने जसप्रीत बुमराह (१८ कोटी), सूर्यकुमार यादव ( १६.३५ कोटी), हार्दिक पांड्या (१६.३५ कोटी), रोहित शर्मा (१६.३० कोटी), तिलक वर्मा (८ कोटी) यांना खरेदी केले. या पाच खेळाडूंना संघात कायम ठेवण्यासाठी मुंबईने १२० कोटींपैकी ७५ कोटी रूपये खर्च केले.
मात्र तरीही संघाच्या अडचणी कमी झाल्या नाहीत. इशान किशन हा देखील मुंबई इंडियन्सचा एक प्रमुख खेळाडू आहे, परंतु फ्रॅंचायझी त्याला संघात कायम ठेवू शकली नाही. त्यानंतर असा अंदाज लावला जात होता की, फ्रँचायझी RTM कार्डचा वापर करून इशानला पुन्हा त्यांच्या संघात समाविष्ट करेल, पण हे शक्य नाही. बीसीसीआयने जाहीर केलेल्या नव्या नियमांनुसार मुंबई इंडियन्स इशान किशनसाठी RTM कार्डचा वापर करू शकत नाही.
बीसीसीआयने आयपीएल २०२५ लिलावासाठी नवे नियम जाहीर केले होते. ज्यामध्ये फ्रँचायझींना जास्तीत जास्त ६ खेळाडू संघात कायम ठेवण्याची परवानगी होती. या ६ खेळाडूंपैकी जास्तीत जास्त ५ कॅप्ड खेळाडू आणि २ अनकॅप्ड खेळाडू असावे.
मुंबई इंडियन्सने संघात कायम ठेवलेले पाचही खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले आहेत. म्हणूनच मुंबईकडे राहिलेला RTM कार्डचा पर्याय आता ते फक्त अनकॅप्ड खेळाडूंवर वापरू शकतात. त्यामुळे मुंबई इंडियन्स इशान किशनला लिलावादरम्यान संघात पुन्हा घेण्यासाठी RTM कार्ड वापरू शकणार नाही.
मुंबई इंडियन्सने रिटेंशनसाठी ७५ कोटी रुपये खर्च केल्यामुळे त्यांच्याकडे आता १२० कोटींपैकी फक्त ४५ कोटी रुपये शिल्लक राहिले आहेत. जर आयपीएल लिलावात कोणत्याही संघाने ईशान किशनवर १० कोटी रुपये किंवा त्याहून अधिक बोली लावली तर मुंबईला त्यांचा स्टार सलामीवीर फलंदाज इशान किशन गमवावा लागू शकतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.