IPL 2025 retention Delhi capital team co-owner Parth Jindal : दिल्ली कॅपिटल्स आणि ऋषभ पंत यांनी अखेर वेगळं होण्याचा निर्णय घेतला. २०१६ मध्ये तो या फ्रँचायझीत आला होता आणि २०२१ मध्ये त्याला कर्णधार केले गेले होते. पण, त्याला यावेळी फ्रँचायझीने रिलीज केले. आता ऋषभ पंतसाठी बऱ्याच फ्रँचायझी मोठी रक्कम मोजण्यासाठी तयार असतील. चेन्नई सुपर किंग्सलाही यष्टिरक्षक-फलंदाज हवा आहे आणि ऋषभ त्यांच्यासाठी परफेक्ट चॉईस आहे. मात्र, आयपीएल रिटेन्शन लिस्ट समोर आल्यानंतर दिल्ली कॅपिटल्सचे सहमालक पार्थ जिंदाल यांनी एक प्रतिक्रिया दिली. त्यावरून ऋषभ पंत पुन्हा दिल्ली कॅपिटल्सच्या ताफ्यात दाखल होऊ शकतो अशी चर्चा सुरू झाली आहे.