IPL retention 2025 Mumbai Indians retain list : मुंबई इंडियन्सने जसप्रीत बुमराहला १८ कोटी देऊन सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. त्यापाठोपाठ सूर्यकुमार यादव व हार्दिक पांड्या ( १६.३५ कोटी) देऊन सूवर्णमध्ये शोधला. रोहित शर्मासाठी त्यांनी १६.३० कोटी मोजले, तर तिलक वर्माला ८ कोटी दिले. पाच खेळाडूंना कायम राखून त्यांनी RTM कार्ड राखून ठेवले. IPL इतिहासातील मुंबई इंडियन्सकडून रोहित शर्माने सर्वाधिक सामने खेळले आहेत.