IPL LSG 2025 captain KL Rahul : इंडियन प्रीमिअर लीगच्या पुढील पर्वासाठी बीसीसीआयने रिटेन्शन नियम जाहीर केले. सहा खेळाडूंना संघात कायम राखण्याची परवानगी सर्व फ्रँचायझींना मिळाली आहे. पण, त्यात एक अनकॅप्ड खेळाडू असायला हवा आणि त्यामुळे सहा खेळाडू रिटेन केल्यास फ्रँचायझीच्या पर्समधून ७९ कोटी रुपये वजा होतील. यामुळे आता खेळाडूंना कायम ठेवा अन् पैसेही वाचवा अशा गणितांची जुळवाजुळव सुरू झाली आहे. त्यात लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार KL Rahul याच्या भवितव्याची चर्चा रंगली आहे आणि अशात LSG चा एक फलंदाज ट्वेंटी-२० मैदान गाजवून त्याच्या कॅप्टन्सीला आव्हान देतोय...
कॅरेबियन प्रीमिअर लीग २०२४ मध्ये त्रिनबागो नाइट रायडर्सकडून खेळणाऱ्या निकोलस पूरनचा फॉर्म हा वेगळ्याच उंचीवर सुरू आहे. त्याने काल गयाना अॅमेझॉन वॉरियर्सच्या गोलंदाजांची धुलाई करून शतक झळकावले. जेसन रॉय आणि पूरन यांनी १५२ धावांची भागीदारी केली आणि TKR साठी ही सर्वोच्च भागीदारी ठरली. रॉय २६ चेंडूंत २ चौकार व २ षटकारांसह ३४ धावांवर बाद झाला. पूरनने मोर्चा सांभाळताना ५९ चेंडूंत ९ चौकार व ८ षटकारांसह १०१ धावांची खेळी केली. केसी कार्टीने १३ चेंडूंत २७ धावांचे योगदान दिले.
नाइट राडर्सने ५ बाद २११ धावा केल्या. वॉरियर्सचा संघ १८.५ षटकांत १३७ धावांवर ऑल आऊट झाला. नॅथन एडवर्ड ( ३-१९), टेरन्स हिंड्स ( ३-१७) व वकार सलामखैल ( ३-२६) यांनी वॉरियर्सला गुंडाळले. निकोलस पूरन मॅन ऑफ दी मॅच ठरला. त्याने CPL च्या या पर्वात १० डावांत ४५.८८ सरासरीने ४१३ धावा केल्या आहेत...
लखनौ सुपर जायंट्सने आयपीएल २०२४ मध्ये निकोलस पूरनसाठी १६ कोटी रुपये मोजले. त्याने आयपीएलचा तो पर्व गाजवला आणि आता KL Rahul च्या जागी त्याला कर्णधार करतील अशी चर्चा सुरू आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.