IPL 2025 BCCI and Owner Meeting - इंडियन प्रीमिअर लीग २०२५ च्या दृष्टीने आज मुंबईत महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अधिकारी आणि फ्रँचायझी मालक हजर राहणार आहेत. यावेळी परदेशी खेळाडू मध्यावरच आयपीएल सोडून जातात हा मुद्दा गाजण्याची शक्यता आहे. अशा खेळाडूंवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी काही फ्रँचायझींनी बीसीसीआयकडे केली आहे. त्याबाबतचा निर्णय आज होण्याची शक्यता आहे.
जेसन रॉय, ॲलेक्स हेल्स आणि वानिंदू हसरंगा या खेळाडूंनी लिलावात कमी बोली मिळाल्यामुळे आयपीएल २०२४ मधून माघार घेतली होती. त्यामुळे आयपीएल व्यवस्थापनाची चिंता वाढली होती. वैयक्तिक कारण, दुखापत या कारणांव्यतिरिक्त अन् कोणतंही कारण ग्राह्य धरलं जाणार नाही, अशी विनंती फ्रँचायझींनी केली आहे. त्यामुळे या मुद्यावर तोडगा काढण्याचे विनंती केली गेली आहे.
BCCI CEO सोबत अलीकडेच झालेल्या बैठकीमध्ये फ्रँचायझींच्या अधिकाऱ्यांनी वैध कारणाशिवाय माघार घेणाऱ्या खेळाडूंवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. काहींनी या खेळाडूंवर बंदी घालण्याची सूचना केली आहे. या तक्रारींवर बीसीसीआयची प्रतिक्रिया आजच्या बैठकीत समोर येणार आहे, कारण या विषयाचा अजेंड्यात समावेश केल्याने बोर्डाच्या या विषयावर गंभीर भूमिका असल्याचे संकेत मिळत आहेत.
अलीकडील हंगामात, इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड (ECB) ने IPL प्ले-ऑफच्या आधी आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी खेळाडूंना परत बोलावले. या निर्णयामुळे बाद फेरीच्या महत्त्वाच्या सामन्यांमध्ये प्रमुख इंग्लिश खेळाडूंना मुकावे लागले आणि त्याचा फटका आयपीएल संघांना बसला. इंग्लंडचा कर्णधार जॉस बटलरनेही ईसीबीच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली होती आणि आयपीएल दरम्यान कोणतेही द्विपक्षीय मालिका खेळवू नये असे त्याचे मत होते.
काही परदेशी खेळाडू मेगा-लिलावात भाग न घेण्याचे निवडतात आणि त्याऐवजी मिनी-लिलावात प्रवेश करतात, हाही मुद्दा फ्रँचायझींनी सांगितला आहे. मिनी ऑक्शनमध्ये परदेशी खेळाडूंना मोठी बोली मिळते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.