Devdutt Padikkal stunning catch Irani Cup 2024 : भारतीय संघाने कानपूर कसोटीत मजबूत पकड घेतली आहे आणि विजयाच्या दिशेने कूच केली आहे. तेच दुसरीकडे चेन्नईत भारताचा १९ वर्षांखालील संघ ऑस्ट्रेलियाची धुलाई करत आहे आणि त्याचवेळी इराणी चषकाचा सामना आजपासून सुरू झाला आहे. रणजी करंडक विजेता मुंबईचा संघ विरुद्ध शेष भारत यांच्यात ही मॅच सुरू आहे. अजिंक्य रहाणे मुंबईचे, तर ऋतुराज गायकवाड शेष भारत संघाचे नेतृत्व करत आहे.
इराणी चषकाच्या सामन्यासाठी काल बीसीसीआयने सर्फराज खान, ध्रुव जुरेल आणि यश दयाल या तीन खेळाडूंना भारताच्या कसोटी संघातून रिलीज केले. लखनौमध्ये सुरू असलेल्या या सामन्यात या तिघांनाही प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळण्याची संधी मिळाली आहे. या सामन्यात शेष भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला.
मुंबईचे दोन फलंदाज ६ धावांवर माघारी परतले आहेत. पृथ्वी शॉ ( ४) पुन्हा अपयशी ठरला आणि हार्दिक तामोरे ( ०) यालाही मुकेश कुमारने माघारी पाठवले. मुकेशच्या गोलंदाजीवर देवदत्त पडिक्कलने स्लीपमध्ये अफलातून झेल घेतला.
२४ वर्षीय पृथ्वी शॉ भारतीय संघात पुनरागमन करण्यासाठी जोरदार प्रयत्न करतोय, परंतु त्याच्या प्रयत्नांना यश मिळत नाही. आजही तो ४ धावांवर माघारी परतला. सूर गवसण्यासाठी तो कौंटी क्रिकेटही खेळायला गेला होता, परंतु तेथेही त्याला फार काही करता आलं नाही. पृथ्वीने भारताकडून ५ कसोटीत १ शतक व २ अर्धशतकांसह ३३९ धावा केल्या आहेत. ६ वन डे सामन्यांत त्याला १८९ धावा करता आल्या आहेत. आयपीएलमध्ये त्याचा फॉर्म हरवलेला दिसला आहे आणि त्यामुळे दिल्ली कॅपिटल्स त्याला संघात कायम राखण्याची शक्यता कमी आहे.
मुंबईचा संघ - अजिंक्य रहाणे, शाम्स मुलानी, पृथ्वी शॉ, आयुष म्हात्रे, सर्फराज खान, हार्दित तामोरे, तनुष कोटियन, श्रेयस अय्यर, मोहित अवस्थी, शार्दूल ठाकूर, जुनैद खान
शेष भारताचा संघ - ऋतुराज गायकवाड, अभिमन्य इश्वरन, बी साई सुदर्शन, देवदत्त पडिक्कल, ध्रुव जुरेल, इशान, एम सुतार, सारांश जैन, एम प्रसिद्ध, मुकेश कुमार, यश दयाल
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.