Irani Cup 2024: कॅप्टन Ajinkya Rahane शतकाच्या उंबरठ्यावर, तर श्रेयस अय्यर-सर्फराजच्याही फिफ्टी

Mumbai vs Rest of India: इराणी कप सामन्यात मुंबईचा कर्णधार अजिंक्य रहाणे शतकाच्या उंबरठ्यावर आहे. त्याच्याशिवाय श्रेयस अय्यर आणि सर्फराज खान यांनीही अर्धशतके केले आहेत.
Ajinkya Rahane - Shreyas Iyer
Ajinkya Rahane - Shreyas IyerSakal
Updated on

Irani Cup 2024, Mumbai vs Rest of India, 1st Day: इराणी कप २०२४ स्पर्धेचा सामना मंगळवारपासून लखनौमध्ये सुरु झाला आहे. या सामन्यात २०२३-२४ रणजी ट्रॉफी विजेता मुंबई संघ शेष भारत संघाविरुद्ध खेळत आहे.

या सामन्यात कर्णधार अजिंक्य रहाणेच्या शानदार खेळाच्या जोरावर पहिल्या दिवस अखेर मुंबई संघाने ६८ षटकात ४ बाद २३७ धावा केल्या आहेत.

एकाना क्रिकेट स्टेडियमवर होत असलेल्या या सामन्यात शेष भारत संघाचा कर्णधार ऋतुराज गायकवाडने नाणेफेक जिंकली आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या मुंबई संघाकडून पृथ्वी शॉ आणि आयुष म्हात्रे सलामीला फलंदाजीला उतरले.

Ajinkya Rahane - Shreyas Iyer
ऋतुराज गायकवाड Vs Ajinkya Rahane! श्रेयस, इशान, शार्दूल, पृथ्वी हेही भिडणार; वाचा जबरदस्त सामना केव्हा कुठे रंगणार

मात्र सुरुवातीलाच शेष भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मुकेश कुमारने मुंबईला मोठे धक्के दिले. त्याने पृथ्वी शॉ याला ४ धावांवर बाद केले, तर आयुष म्हात्रेला १९ धावांवर माघारी धाडले. हार्दिक तोमरेही भोपळाही न फोडता बाद झाला. त्यामुळे एका क्षणी मुंबईची अवस्था ३ बाद ३७ धावा अशी झाली होती.

पण यानंतर कर्णधार अजिंक्य रहाणे आणि श्रेयस अय्यर या अनुभवी खेळाडूंनी मुंबईचा डाव सावरला. त्यांनी शतकी भागीदारी करताना त्यांची अर्धशतकेही पूर्ण केली. पण त्यांची १०२ धावांची भागीदारी यश दयालने श्रेयस अय्यरला बाद करत तोडली. श्रेयसने ८४ चेंडूत ५७ धावांची खेळी केली.

Ajinkya Rahane - Shreyas Iyer
IND vs BAN: कानपूर कसोटी सुरू असतानाच टीम इंडियातून ३ खेळाडू झाले बाहेर, BCCI ने कारणही केलं स्पष्ट

तो बाद झाल्यानंतरही सर्फराज खानने संयमी खेळणाऱ्या अजिंक्य रहाणेला चांगली साथ दिली. त्यांनी चौथा दिवस संपेपर्यंत ९८ धावांची भागीदारी केली आहे. सर्फराजनेही अर्धशतक केले आहे. तसेच रहाणे आता शतकाच्या उंबरठ्यावर आहे.

त्याने आता सामन्याच्या दुसऱ्या दिवशी शतक केले, तर हे त्याचे प्रथम श्रेणी क्रिकेटमधील ४१ वे शतक ठरेल. चौथ्या दिवस अखेर अजिंक्य रहाणे १९७ चेंडूत ६ चौकार आणि १ षटकारासह नाबाद ८६ धावा केल्या. सर्फराज खानने ८८ चेंडूत ५४ धावांची नाबाद खेळी केली.

शेष भारत संघाकडून मुकेश कुमारने ३ विकेट्स घेतल्या. तसेच यश दयालने १ विकेट घेतली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.