Simranjit Singh: आयर्लंडच्या क्रिकेटपटूची भारतात मृत्यूशी झुंज; गाजवलंय आंतरराष्ट्रीय क्रिकेट

Ireland cricketer liver failure आयरिश क्रिकेटपटू सिमरनजीत सिंग याची गुरुग्राममध्ये यकृत निकामी झाल्यामुळे प्रकृती गंभीर झाली आहे.
Simranjit Singh
Simranjit Singhesakal
Updated on

Ireland cricketer fighting for life : ३७ वर्षीय सिमरनजीत सिंग हा सध्या गुरुग्राम येथील मेदांता हॉस्पिटल येथे अतिदक्षता विभागात ( ICU) उपचार घेत आहे आणि तो यकृत प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेत आहे. अनेक महिन्यांपासून तो आजारी आहे आणि त्याच्या प्रकृतीने गंभीर वळण घेतले. डॉक्टर त्याच्या प्रकृतीत सुधारणा व्हावा यासाठी प्रयत्न करत आहेत. सिमरनजीत सिंगने २०१७ मध्ये आयर्लंडकडून पदार्पम केले आणि कारकीर्दित त्याने आयर्लंडसाठी ३५ वन डे आणि ५३ ट्वेंटी-२० सामने खेळले आहेत. त्याने वन डेत ३९ व ट्वेंटी-२० ४४ विकेट्स घेतल्या आहेत.

मोहाली, पंजाब येथे जन्मलेल्या सिमरनजीतने पंजाबच्या १४ व १७ वर्षांखालील संघाचे प्रतिनिधित्व केले होते. चांगली कामगिरी केल्यानंतरही त्याला १९ वर्षांखालील संघात स्थान मिळाले नाही. ज्यामुळे त्याला हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी २००५ मध्ये आयर्लंडला जावे लागले. २००६ मध्ये डब्लिनमधील मलाहाइड क्रिकेट क्लबमध्ये तो सहभागी झाला आणि नंतर आयर्लंड संघात स्थान मिळवले.

Simranjit Singh
IND vs BAN : भारतीय संघात २५ वर्षीय खेळाडू पदार्पण करणार; Jasprit, Shami ची उणीव भरून काढणार, जाणून घ्या संभाव्य संघ

मागील ५-६ महिन्यांपासून त्याची प्रकृती खालावली होती. डब्लिनमध्ये असतानाच त्याची प्रकृती बिघडू लागली होती. त्याला वारंवार ताप येत होता आणि त्यामागचे निदान होत नव्हते. त्यानंतर त्याच्या कुटुंबियांनी त्याला भारतात उपचार घेण्यासाठी आणण्याचा निर्णय घेतला. जूनच्या उत्तरार्धात तो भारतात आला आणि चंदीगडमध्ये अनेक सल्लामसलत केली. डॉक्टरांना सुरुवातीला क्षयरोगाचा संशय आला. अँटीबायोटिक्स आणि स्टिरॉइड्सचा दीर्घकाळ कोर्स करून टीबीवर उपचार घेत असतानाही सिंग यांची प्रकृती बिघडली आणि त्याला कावीळ झाली.

Simranjit Singh
Duleep Trophy 2024: टीम इंडियात एन्ट्री घेऊ पाहणारा स्टार फलंदाज फेल, निम्मा संघ ३४ धावांत तंबूत; रोहितची चिंता वाढली

सिमीची तब्येत सतत ढासळत राहिल्याने, PGI चंदीगड येथील डॉक्टरांनी यकृत निकामी झाल्याचे ओळखले आणि मेदांता हॉस्पिटल, गुरुग्राम येथे त्वरित हलविण्याचा सल्ला दिला. ३ सप्टेंबर रोजी कुटुंबीयांनी त्याला मेदांता येथे हलवण्याचा निर्णय घेतला, जिथे तो शस्त्रक्रियेच्या प्रतीक्षेत आहे. सिमी सिंगची पत्नी, आगमदीप कौर यकृत दान करण्यासाठी तयार आहे. लवकरच ट्रान्सप्लाट केले जाण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.