IRE vs SA T-20 series : आयर्लंडने ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये रविवारी ऐतिहासिक विजयाची नोंद केली. दोन सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या लढतीत त्यांनी बलाढ्य दक्षिण आफ्रिकेला पराभूत केले. आयर्लंड संघाचा हा आफ्रिकेवरील पहिलाच विजय ठरला. अबू धाबी येथे काल दक्षिण आफ्रिका विरूद्ध आयर्लंड असा ट्वेंटी-२० सामना झाला. आयर्लंडने विजय मिळवून मालिका १-१ अशी बरोबरीत रोखली. या सामन्यात Adair बंधू चमकले.
रॉस एडरने शतक लगावत आयर्लंडसाठी मोठी धावसंख्या उभारली, तर त्याचा भाऊ मार्क एडरने ४ विकेट्स घेत आफ्रिकेची फलंदाजी उद्धवस्त केली. दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आयर्लंडचे सलामीवीर पॉल स्टर्लिंग व रॉस एडर यांनी धमाकेदार फलंदाजीने सुरूवात केली. त्यांनी पहिल्या विकेटसाठी १३७ धावांची भागीदारी केली. १३व्या षटकात कर्णधार स्टर्लिंगला ५२ धावांवर माघारी परतला.
हॅरी टेक्टर ( ५) फार काळ मैदानावर टिकला नाही. आफ्रिकेच्या विलियम्सने त्याला माघारी पाठवले. दुसऱ्या बाजूने रॉसने ५८ चेंडूंमध्ये शतक पूर्ण केले. या खेळीदरम्यान त्याने ५ चौकार व ९ षटकार लगावले. एडर १०० धावांवर बाद झाल्यानंतर आयर्लंडचा डाव गडगडला. त्यांना २० षटकांत ६ बाद १९५ धावा उभारता आल्या.
दक्षिण आफ्रिकेने १९६ धावांचा पाठलाग करताना चांगली सुरूवात केली. परंतु आयर्लंडच्या हुमने ५० धावांची भागीदारी तोडताना रायन रिकेल्टन ( ३६) याला बाद केले. त्यानंतर आलेल्या मॅथ्यू ब्रीत्झके आणि रिझा हेंड्रिक्स यांनी दमदार फलंदाजी केली. दोघांनी वैयक्तिक अर्धशतक झळकावताना संघाला विजयाच्या दिशेने नेले होते. पण, मार्क एडरने ४ विकेट्स घेतल्या आणि त्याला ग्रॅहम हुमची ( ३ विकेट्स) साथ मिळाली. आफ्रिकेला ९ बाद १८५ धावा करता आल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.