Yusuf Pathan: मेरा भाई जीत गया! युसूफ खासदार बनताच धाकटा भाऊ इरफानची भावुक पोस्ट

Irfan Pathan: युसूफ पठाणने पश्चिम बंगालमधील बहरामपूर लोकसभा मतदारसंघातून विजय मिळवला आहे, त्याबद्दल इरफान पठाणने भावनिक पोस्ट केली आहे.
Yusuf Pathan | Irfan Pathan
Yusuf Pathan | Irfan PathanSakal
Updated on

Loksabha Election 2024: भारतात सध्या लोकसभा निवडणूकीच्या निकालाचीच चर्चा आहे. यंदाच्या निवडणूकीसाठी पश्चिम बंगालमधील बहरामपूर मतदारसंघातून भारताचा माजी अष्टैपैलू खेळाडू युसूफ पठाण तृणमुल काँग्रेस पक्षाकडून उभा होता.

विशेष म्हणजे त्याने या मतदार संघातून विजय देखील संपादन केला आहे. त्यामुळे आता युसूफ पठाण खासदार म्हणून देखील ओळखला जाईल. त्याच्या या विजयाबद्दल त्याचा धाकटा भाऊ इरफान पठाणने खास पोस्ट शेअर केली आहे.

Yusuf Pathan | Irfan Pathan
Varanasi Loksabha Election Result 2024: सुरुवातीच्या कलांमध्ये मोदींना घाम फोडणारे अजय राय कोण? तीनवेळा राहिलेत भाजपचे आमदार

इरफानने पोस्टमध्ये लिहिले आहे की 'लाला, तू उदात्त हेतूने आणि अढळ आत्मविश्वासाने अनुभवी राजकाऱ्यांविरुद्ध विजय मिळवण्यासाठी खडतर प्रवास सुरू केला आहे. तुझ्या अटूट संकल्पाने आणि सचोटीने तू तुझ्या उदात्त हेतूंना कृतीमध्येही उतरवशील आणि आपल्या देशातील नागरिकांचे जीवन समृद्ध करशील. माझा भाऊ जिंकलाय.'

युसूफ पठाणला बहरामपूर येथे सर्वात मोठे आव्हान अधीर रंजन चौधरीचे यांचे होते. बहरामपूर मतदारसंघ अधीर रंजन चौधरी यांचा बालेकिल्ला समजला जात होता. मात्र, आता असे समजत आहे की युसूफने जळपास 60 हजारांहून अधिक मतांनी त्यांना पराभूत केले आहे. विशेष म्हणजे तब्बल 25 वर्षांनंतर अधीर रंजन चौधरी पराभूत झाले आहेत.

Yusuf Pathan | Irfan Pathan
Baharampur Constituency Lok Sabha Election Result : अधीर रंजन चौधरी यांच्या 'बालेकिल्ला'ला युसूफ पठाणने लावला सुरूंग

दरम्यान, विजयानंतर युसूफने म्हटले आहे की कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळे त्याला विजय मिळाला असून रेकॉर्ड हे तुटण्यासाठी असतात. तसेच तो अधीर रंजन चौधरी यांचा खूप आदर करतो. त्याने असेही म्हटले की तो बहरामपूर येथे स्पोर्ट्स ऍकेटमी चालू करणार असून इतरही विकासाची कामे करेल.

युसूफ हा अनेकवर्षे भारतीय संघाकडून खेळला आहे. 2007 सालच्या टी20 वर्ल्ड कप आणि 2011 सालच्या वनडे वर्ल्ड कप विजेत्या भारतीय संघाचाही तो भाग राहिला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.