IPL 2025 Rules: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI ) शनिवारी इंडियन प्रीमिअर लीग २०२५ ते २०२७ साठी काही नियम जाहीर केले आहेत. माजी क्रिकेटपटू इरफान पठाणने यातील एका महत्वाच्या नियमाचे स्वागत केले आहे. कारण आगामी आयपीएलसाठी हा नियम अत्यंत महत्वाचा असून इरफान पठाण वारंवार या नियमासाठी बीसीसीआयकडे मागणी करत होता.
हा नियम असा आहे की जर फ्रँचायझीने एखाद्या खेळाडूला विकत घेतले आणि तो खेळाडू लीगसाठी उपलब्ध राहू शकला नाही किंवा तो लीगमध्येच सोडून गेला, तर त्या खेळाडूला २ वर्षांसाठी आयपीएलमध्ये बंदी घातली जाऊ शकते.
विदेशी खेळाडू छोट्या-मोठ्या कारणांसाठी नेहमीच असे करताना दिसतात. नॅशनल ड्यूटी हे कारण देऊन खेळाडू मध्येच लीग सोडून जातात किंवा आधीपासूनच लीग खेळायला येण्यास नकार देतात. त्यामुळे संघाचा समतोलपणा बिघडतो. परंतु खेळाडूंना आता असे करता येणार नाही. कारण लिलावाद्वारे संघामध्ये निवड झालेली असताना जर कोणता खेळाडू मेडिकल आणि दुखापतीच्या कारणाव्यतिरीक्त लीगमध्ये खेळण्यास नकार देत असेल तर त्या खेळाडूला २ वर्षांसाठी आयपीएल खेळण्यासाठी बंदी घालण्यात येऊ शकते.
या नव्या नियमाबद्दल बोलताना माजी गोलंदाज व समालोचक इरफान पठाण म्हणाला, "गेली दोन वर्षे मी या विषयावर बोलत आलो आहे. बीसीसीआयने घेतलेला निर्णय पाहून आनंद झाला. लिलावात निवड झाल्यानंतर अनुपलब्धता घोषित करणाऱ्या खेळाडूंना आता दोन वर्षांच्या बंदीला सामोरे जावे लागेल. यामुळे आयपीएल आणखी मजबूत होत आहे."
बीसीसीआयने शनिवार आयपीएल २०२५ च्या मेगा लिलावाबाबत एक पत्रकार परिषद घेतली आणि फ्रँचायझींनसाठी व एकूणच आयपीएल २०२५ हंगामासाठी नियमावली जाहीर केली. आयपीएलच्या गव्हर्निंग कौन्सिलने सांगितले की, फ्रँचायझींना एकूण ६ खेळाडूंना संघात कायम ठेवता येईल. तर या ६ खेळाडूंना कायम ठेवण्यासाठी एकूण ७५ कोटी रूपये मोजावे लागतील. या मुद्द्यांमध्ये, हे देखील सांगण्यात आले की जर एखाद्या खेळाडूने मेगा लिलावासाठी नोंदणी केली नाही, तर त्याला यापुढे मिनी लिलावात समाविष्ट केले जाणार नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.