Team India: रहाणे-पुजारासाठी दरवाजे बंद, तर श्रेयस अय्यर-इशान किशनचे होणार कसोटीत पुनरागमन? BCC ने दिले संकेत

Duleep Trophy Squads: बीसीसीआयने दुलीप ट्रॉफी स्पर्धेसाठी चार संघ निवडले असून त्यात श्रेयस अय्यर आणि इशान किशनलाही संधी देण्यात आली आहे.
Cheteshwar Pujara | Ajinkya Rahane | Shreyas Iyer | Ishan Kishan
Cheteshwar Pujara | Ajinkya Rahane | Shreyas Iyer | Ishan KishanSakal
Updated on

Ajinkya Rahane and Cheteshwar Pujara: दुलीप ट्रॉफी २०२४ स्पर्धेला ५ सप्टेंबरपासून सुरुवात होत आहे. ६ प्रथम श्रेणी सामन्यांच्या या स्पर्धेसाठी ४ संघांची निवड करण्यात आली आहे. ए, बी, सी आणि डी अशी नावं चार संघांना देण्यात आली आहेत.

आगामी कसोटी सामन्यांचं वेळापत्रक पाहाता ही मालिका भारतीय संघातील स्टार खेळाडूंसाठीही महत्त्वाची आहे. त्यामुळे अनेक मोठे खेळाडू या स्पर्धेत खेळताना दिसणार आहेत.

दरम्यान, अपेक्षेनुसार विराट कोहली, रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह आणि आर अश्विन यांना विश्रांती देण्यात आली आहे. पण रविंद्र जडेजा, केएल राहुल, ऋषभ पंत, कुलदीप यादव, खलील अहमद, यशस्वी जयस्वाल, सर्फराज खान, सूर्यकुमार यादव, अक्षर पटेल, शुभमन गिल असे अनेक स्टार खेळाडू स्पर्धेत असणार आहेत.

Cheteshwar Pujara | Ajinkya Rahane | Shreyas Iyer | Ishan Kishan
Duleep Trophy Schedule: स्टार खेळाडू भिडणार! जाणून घ्या दुलीप ट्रॉफीचं संपूर्ण वेळापत्रक एका क्लिकवर
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.