बिहारमधील पोटनिवडणुकीपूर्वी राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी सुरू आहेत. सत्ताधारी पक्ष संयुक्त जनता दलासाठी मोठी बातमी समोर येत आहे. धडाकेबाज फलंदाज इशान किशनचे वडील ई. प्रणव कुमार पांडे उर्फ चुन्नू त्यांच्या समर्थकांसह नितीश कुमार यांच्या जनता दल युनायटेड पक्षात सहभागी होऊ शकतात.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जेडीयू कार्यालयात आज म्हणजेच रविवारी दुपारी एक बैठक आयोजित करण्यात आली आहे. यावेळी प्रणव कुमार जेडीयूमध्ये प्रवेश करू शकतात.