Ishan Kishan : इशान किशनचं डोकं भानावर आलं; BCCI च्या आक्रमक भूमिकेनंतर घेतला महत्त्वाचा निर्णय

Ishan Kishan vs BCCI : गेल्या काही महिन्यांपासून इशान किशन हे नाव क्रिकेटच्या मैदानावरील कामगिरीमुळे नव्हे तर त्याच्या वर्तवणुकीमुळे चर्चेत राहिलं आहे.
Ishan Kishan vs BCCI
Ishan Kishan vs BCCIesakal
Updated on

Ishan Kishan has agreed to play - दक्षिण आफ्रिका दौऱ्या अर्ध्यावर सोडून येण्यासाठी इशान किशनने मानसिक थकवा आल्याचं सांगितलं... BCCI ने त्वरित त्याची विनंती मान्य केली आणि त्यानंतर यष्टिरक्षक-फलंदाज दुबईत पार्टी करताना दिसला. त्यानंतरही त्याला भारतीय संघात निवडीसाठी देशांतर्गत क्रिकेट खेळण्याचा सल्ला दिला गेला. पण, त्याने त्याकडे वारंवार दुर्लक्ष केलं आणि अखेर BCCI ने त्याला वार्षिक करारातून काढून टाकले. आता एवढं सगळं घडून गेल्यानंतर इशानचं डोकं भानावर आलं आहे.

भारताचा यष्टिरक्षक फलंदाज इशान किशन याने रणजी करंडक स्पर्धेच्या आगामी पर्वात झारखंड संघाकडून खेळण्याचा निर्णय घेतला आहे. झारखंड राज्य क्रिकेट संघटनेने ( JSCA) जाहीर केलेल्या २५ संभाव्य खेळाडूंमध्ये इशानचे नाव आहे. २६ वर्षीय इशानने झारखंड संघाकडून खेळण्याची तयारी दर्शवली आहे आणि कदाचित तो कर्णधाराच्या भूमिकेत दिसू शकतो, असे वृत्त क्रिकबजने दिले आहे. तो केव्हा व कोणती मॅच खेळेल याची अद्याप अधिकृत माहिती हाती आलेली नाही.

Ishan Kishan vs BCCI
टीम इंडिया पाकिस्तान दौऱ्यावर जाणारच नाही, ICC ने एकप्रकारे केले मान्य! घेतला मोठा निर्णय

राष्ट्रीय निवड समितीतील काही सदस्यांच्या सांगण्यावरून इशानने हा निर्णय घेतला आहे. कारकीर्दिच्या महत्त्वाच्या वळणावर तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटला मुकण्याची शक्यता त्याला समजावून सांगितली गेली आणि त्यानंतर तो देशांतर्गत क्रिकेट खेळण्यास तयार झाला. जुलै २०२१ ते नोव्हेंबर २०२३ या कालावधीत इशान भारताकडून २ कसोटी, २७ वन डे व ३२ ट्वेंटी-२० सामने खेळला. त्याने वन डे क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावणाऱ्या युवा फलंदाजाचा मान पटकावला आणि तो मागच्या वर्षी झालेल्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेतील संघाचा सदस्यही होता.

राष्ट्रीय निवडकर्ते आणि BCCI च्या स्पष्ट सूचना असूनही इशानने गेल्या हंगामात राज्याच्या संघाकडून खेळण्यास नकार दिला. त्याने केवळ आयपीएलमध्ये भाग घेण्याचा निर्णय घेतला आणि बडोद्यातील एका अकादमीमध्ये त्यासाठी तयारीला गेला. नोव्हेंबर २०२३ मध्ये तो भारतासाठी त्याचा शेवटचा सामना खेळला आणि मागील डिसेंबरमध्ये दक्षिण आफ्रिकेत भारतीय संघातून निराश होऊन माघारी परतला. आंध्र प्रदेशातील अनंतपूर येथे ५ सप्टेंबर रोजी दुलीप करंडक स्पर्धेने देशांतर्गत हंगामाची सुरुवात होईल. या स्पर्धेसाठी इशानचा चार सहभागी संघांसाठी विचार करण्याची शक्यता कमीच आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.