Ishan Kishan injured
Ishan Kishan injured esakal

Ishan Kishan ने पुन्हा घोळ घातला; टीम इंडियातील पुनरागमन लांबणीवर, Sanju Samson ला संधी

Duleep Trophy 2024 : दुलीप ट्रॉफी २०२४-२५ स्पर्धेला ५ सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. यंदा या स्पर्धेत अनेक मोठे स्टार खेळाडू खेळताना दिसणार आहेत. या स्पर्धेत ए, बी, सी आणि डी असे चार संघ खेळताना दिसणार आहेत. या चार संघात एकूण ६ सामने होणार असून २२ सप्टेंबर रोजी ही स्पर्धा संपणार आहे.
Published on

Ishan Kishan Duleep Trophy : भारतीय संघात पुनरागमनासाठी धडपडणाऱ्या इशान किशनला आणखी एक धक्का बसला आहे. दुलीप ट्ऱॉफीत दमदार कामगिरी करून भारतीय संघात परतण्याचा त्याचा मानस होता. पण, त्याला आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे. बुची बाबू निमंत्रित क्रिकेट स्पर्धेत झारखंडचे प्रतिनिधितत्व करताना त्याने शतक झळकावले होते. पण, दुसऱ्या सामन्यात तो अपयशी ठरला. त्यात आता आणखी एक वृत्त समोर येत आहे आणि त्यानुसार त्याची संघात परतण्याची संधी हुकणार आहे.

उद्यापासून सुरू होणाऱ्या दुलीप ट्रॉफी स्पर्धेतील पहिल्या सामन्यात त्याची खेळण्याची शक्यता कमी आहे. २०२४ पासून इशान राष्ट्रीय संघाबाहेर आहे आणि त्याने देशांतर्गत क्रिकेट खेळण्यास टाळाटाळ केली होती. त्यामुळेच बीसीसीआयने त्याची वार्षिक करारातून हकालपट्टी केली होती. त्यानंतर इशान बुची बाबू स्पर्धेत खेळला आणि दुलीप ट्रॉफीत खेळण्यासाठी सज्ज होता. पण, त्याला दुखापत झाल्याचे वृत्त क्रिकबजने दिले आहे. त्यामुळे तो दुलीप ट्रॉफीच्या पहिल्या फेरीत खेळणार नसल्याचे सांगण्यात येत आहे. दुसऱ्या टप्प्यात तरी तो खेळेल की नाही, हेही निश्चित नाही. अशात त्याच्या जागी संजू सॅमसन याचा भारत ड संघात समावेश करण्यात येईल, असा अंदाज आहे.

ड संघ - श्रेयस अय्यर (कर्णधार), अथर्व तायडे, यश दुबे, देवदत्त पडिक्कल, इशान किशन (यष्टीरक्षक), रिकी भुई, सरांश जैन, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, आदित्य ठाकरे, हर्षित राणा, तुषार देशपांडे, आकाश सेनगुप्ता, केएस भारत (यष्टीरक्षक), सौरभ कुमार.

सूर्यकुमार यादवची माघार...

दुलीप ट्रॉफी स्पर्धेच्या पहिल्या फेरीसाठी गेल्याच महिन्यात चार संघांची घोषणा झाली आहे. पण आता रविंद्र जडेजा आणि मोहम्मद सिराज यांच्यापाठोपाठ सूर्यकुमार यादवने पहिल्या फेरीतून माघार घेतली आहे. सूर्यकुमारला त्याच्या हाताच्या दुखापतीमुळे दुलीप ट्रॉफीच्या पहिल्या फेरीतून माघार घ्यावी लागली आहे. त्याचा समावेश इंडिया क संघात होता. सूर्यकुमारला बुची बाबू स्पर्धेत खेळताना ही दुखापत झाली आहे.

Ishan Kishan injured
Suryakumar Yadav मुंबई इंडियन्सची साथ सोडतोय? KKR ने दिलेल्या कॅप्टन्सी ऑफरवर मोठे अपडेट्स

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...