Jacob Oram bowling coach for New Zealand : भारत-न्यूझीलंड तीन सामन्यांची कसोटी मालिका १६ ऑक्टोबर पासून सुरु होणार आहे. जागतिक कसोटी क्रमवारीत भारत दुसऱ्या स्थानावर आहे आणि संघाच्या अव्वल फलंदाजांना रोखण्यासाठी न्यूझीलंडने मास्टर प्लान आखला आहे. न्यूझीलंडने गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून माजी अष्टपैलू खेळाडू जेकब ओरम याची निवड केली आहे. ७ ऑक्टोबरपासून ओरम आपली जबाबदारी स्वीकारेल.
शेन जर्गेनसेन हे न्यूझीलंडचे गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून कार्यरत होते. पण शेन यांच्या निवृत्तीनंतर रिक्त पदाची जागा भरण्यासाठी जेकब ओरमची नियुक्ती करण्यात आली आहे. "न्यूझीलंड संघात पुन्हा सहभागी होण्याची संधी मिळाल्याने मी खरोखरच उत्साहित आहे," असे ओरम म्हणाला. जेकबच्या नावावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ४५०० हून अधिक धावा अन् २५० विकेट्स आहेत.
“माझ्यासाठी हे खूप महत्त्वाचे आहे आणि माझ्या आयुष्याचा एक मोठा भाग असलेल्या संघात परत सामील होणे, हा माझ्यासाठी सन्मान आहे. माझ्याकडे यापूर्वी अनेक संघांसोबत प्रशिक्षक म्हणून काम केल्याचा अनुभव आहे. न्यूझीलंड संघामध्ये नवीन कौशल्यवान गोलंदाज तयार होत आहेत. मी माझे ज्ञान आणि अनुभव वापरून त्यांना आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या आव्हानांसाठी तयार राहण्यास मदत करू शकेन, " अशी आशा त्याने व्यक्त केली.
गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून निवड होण्यापूर्वी ओरमने न्यूझीलंड संघासोबत काम केले आहे. मागील वर्षी बांगलादेशच्या कसोटी दौऱ्यात, ऑस्ट्रेलियाविरुद्धची ट्वेंटी-२० मालिका आणि या वर्षाच्या सुरुवातीला झालेल्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत त्याने गोलंदाज प्रशिक्षक म्हणून काम केले होते.
त्याने २०१४ मध्ये न्यूझीलंड-अ संघासोबत आपल्या प्रशिक्षक कारकीर्दिची सुरुवात केली होती. त्यानंतर २०१८ पासून न्यूझीलंड महिलांसोबत गोलंदाज प्रशिक्षक म्हणून काम केले आहे. मागच्या वर्षी त्यांना सेंट्रल हिंड्सचे मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्त करण्यात आले होते आणि संघ सुपर स्मॅश फायनलमध्ये पोहोचला होता. ओरम हे अबूधाबी टी-१० मध्ये सहाय्यक प्रशिक्षक आणि SA20 मध्ये MI केपटाऊनचा गोलंदाज प्रशिक्षक आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.