James Anderson Retirement : ब्रेंडन मॅक्क्युलममुळे इंग्लंडची 41 वर्षाची तोफ थंडावणार, जेम्स अँडरसन कसोटीतून निवृत्त होणार?

James Anderson May Announce Retirement : इंग्लंडचा महान वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याच्या तयारीत आहे.
James Anderson May Announce Retirement Marathi News
James Anderson May Announce Retirement Marathi Newssakal
Updated on

James Anderson May Announce Retirement : इंग्लंडचा महान वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याच्या तयारीत आहे. द गार्डियनच्या वृत्तानुसार, ब्रेंडन मॅक्क्युलम नुकताच यूकेच्या पाच दिवसांच्या दौऱ्यावर होता. मॅक्युलमने अँडरसनला प्रत्यक्ष भेटण्यासाठी न्यूझीलंड ते यूकेला प्रवास केला. येथील गोल्फ सामन्यादरम्यान ब्रेंडन मॅक्क्युलमने अँडरसनला स्पष्ट केले की संघ भविष्याकडे पाहू लागला आहे.

James Anderson May Announce Retirement Marathi News
MS Dhoni Fan : धोनीचा क्रेझी फॅन अचानक घुसला मैदानात... धरले ‘थला’चे पाय अन् पुढे...; व्हिडिओ व्हायरल

अँडरसनने आपल्या कारकिर्दीत अनेक मोठे विक्रम केले आहेत. या वर्षाच्या सुरुवातीला तो भारत दौऱ्यावर आला होता. जिथे त्याने 700 कसोटी विकेट घेण्याचा विक्रम केला. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा तो जगातील तिसरा गोलंदाज ठरला आहे.

अँडरसनचे वय 41 वर्षे आहे आणि जुलैमध्ये तो 42 वर्षांचा होईल. त्यावेळी इंग्लंडचा संघ वेस्ट इंडिजविरुद्ध तीन सामन्यांची मालिका खेळणार आहे. श्रीलंकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेनंतर तो निवृत्तीची घोषणा करू शकतो. श्रीलंका मालिका एमिरेट्स ओल्ड ट्रॅफर्ड येथे सुरू होईल. अँडरसनचे हे घरचे मैदान आहे.

James Anderson May Announce Retirement Marathi News
Virat Kohli : टी-20 वर्ल्डकपपूर्वी 'दादा'ने टीम इंडियाला दिला सल्ला, विराट कोहलीला 'या' क्रमांकावर खेळवा...

जेम्स अँडरसनने या वर्षी मार्चमध्ये भारताविरुद्ध शेवटची कसोटी खेळली होती. शेवटचा एकदिवसीय सामना मार्च 2015 मध्ये आणि टी-20 आंतरराष्ट्रीय सामना नोव्हेंबर 2009 मध्ये खेळला गेला होता.

अँडरसनने 187 सामन्यांच्या 348 डावात 700 विकेट घेतल्या आहेत. त्याच्या नावावर एकदिवसीय सामन्यात 194 सामन्यात 269 बळी आणि 19 टी-20 सामन्यात 18 बळी आहेत. अँडरसनने 2003 मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले.

James Anderson May Announce Retirement Marathi News
IRE vs PAK T20 series : पाकिस्तान आर्मी ट्रेनिंगचा पहिल्याच सामन्यात उडाला फज्जा; लिंबूटिंबू आयर्लंडचा ऐतिहासिक विजय

अँडरसन हा सर्वाधिक कसोटी खेळणारा जगातील दुसरा खेळाडू आहे. सचिन तेंडुलकर त्याच्या पुढे आहे. गेल्या वर्षीही अँडरसनच्या निवृत्तीची बरीच चर्चा झाली होती. त्यानंतर तो म्हणाला की त्याला उन्हाळ्यात इंग्लंड संघात आपले स्थान निर्माण करायचे आहे. असे बोलले जात आहे की अँडरसन स्वत: शनिवारी त्याच्या भविष्याबाबत सुरू असलेली चर्चा पुढे आणू शकतो.

इंग्लंड संघ 2025 मध्ये भारताविरुद्ध मायदेशात मालिका खेळणार आहे. यानंतर संघ न्यूझीलंड आणि पाकिस्तानमध्ये कसोटी मालिका खेळणार आहे. आणि मग ऑस्ट्रेलियात ऍशेसचे आयोजन केले जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.