James Anderson : निवृत्तीनंतर जेम्स अँडरसन आता करणार नव्या इनिंगला सुरुवात; दिसणार 'या' भूमिकेत

James Anderson New Job After Retirement : इंग्लंड संघाचा सर्वात यशस्वी वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने आता कसोटी क्रिकेटला अलविदा केला आहे. अँडरसनने शेवटचा कसोटी सामना वेस्ट इंडिजविरुद्ध लॉर्ड्सवर खेळला.
James Anderson New Job After Retirement
James Anderson New Job After Retirementsakal
Updated on

James Anderson New Job After Retirement : इंग्लंड संघाचा सर्वात यशस्वी वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने आता कसोटी क्रिकेटला अलविदा केला आहे. अँडरसनने शेवटचा कसोटी सामना वेस्ट इंडिजविरुद्ध लॉर्ड्सवर खेळला.

अँडरसनच्या निवृत्तीनंतर हा स्टार वेगवान गोलंदाज पुढे काय करणार आहे, असा प्रश्न चाहत्यांच्या मनात निर्माण होत आहे. वृत्तानुसार, इंग्लंड क्रिकेट बोर्डाने याबाबत एक मोठे अपडेट दिले आहे.

James Anderson New Job After Retirement
Hardik Pandya Video : अनंत अंबानींच्या लग्नात हार्दिक पांड्याचं विमान ढगात? वेटर सोबत बोलतानाचा 'तो' Unseen व्हिडीओ व्हायरल

सध्या वेस्ट इंडिज आणि इंग्लंड यांच्यात कसोटी मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील पहिला सामना जेम्स अँडरसनचा शेवटचा कसोटी सामना होता. आपल्या शेवटच्या सामन्यात जेम्स अँडरसनने शानदार गोलंदाजी करत 4 विकेट्स घेतल्या. आता कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर अँडरसन एका नव्या भूमिकेत दिसणार आहे.

वृत्तानुसार, इंग्लंड क्रिकेट संचालक रॉब यांनी सांगितले की, जेम्स अँडरसन लवकरच वेगवान गोलंदाजी मार्गदर्शक म्हणून इंग्लंड संघात सामील होऊ शकतो.

James Anderson New Job After Retirement
ICCमध्ये खळबळ! T20 World Cup आयोजनावरून वाद, दोन अधिकाऱ्यांचा तडकाफडकी राजीनामा

स्टार वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने इंग्लंडकडून 22 वर्षे क्रिकेट खेळले. अँडरसनने 2003 मध्ये इंग्लंडकडून कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. आणि आपल्या कसोटी कारकिर्दीत 188 सामने खेळले. या काळात त्याने 704 विकेट्स घेतल्या होत्या. अँडरसन कसोटी क्रिकेटमध्ये 700 हून अधिक बळी घेणारा जगातील पहिला गोलंदाज आहे. जर आपण त्याच्या वनडे आणि टी-20 कारकिर्दीबद्दल बोललो तर अँडरसनने 194 वनडे मॅचमध्ये 269 आणि 19 टी-20 मॅचमध्ये 18 विकेट घेतल्या होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.