England vs Sri Lanka 1st Test Jamie Smith: इंग्लंडने मँचेस्टर कसोटीत चांगली पकड घेतली आहे. श्रीलंकेचा पहिला डाव २३६ धावांवर गुंडाळल्यानंतर इग्लंडने ३५८ धावा करून आघाडी घेतली. श्रीलंकेला दुसऱ्या डावात ६८ धावांत ३ धक्के बसले आहेत आणि अजूनही ते ५५ धावांनी पिछाडीवर आहेत. इंग्लंडचा डावही गडगडला होता, परंतु २४ वर्षीय यष्टिरक्षक-फलंदाज जेमी स्मिथ याने त्यांना सावरले. श्रीलंकेच्या गोलंदाजांसमोर युवा फलंदाज उभा राहिला आणि ९४ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला.
श्रीलंकेने पहिल्या डावात २३६ धावा केल्या आणि त्यात कर्णधार धनंजया डी सिल्वाच्या ७४ धावांचा आणि मिलन रथनायके ( ७२) यांचा महत्त्वाचा वाटा आहे. इंग्लंडकडून ख्रिस वोक्स व शोएब बशीर यांनी प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या. प्रत्युत्तरात, इंग्लंडचे आघाडीचे तीन फलंदाज ६७ धावांवर तंबूत परतले होते. जो रूट ( ४२) व हॅरी ब्रूक ( ५६) यांनी संघाला आधार दिला. त्यानंतर स्मिथ १४८ चेंडूंत ८ चौकार व १ षटकारांसह १११ धावांची अप्रतिम खेळी करून गेला.
संघाच्या ३१५ धावा असताना स्मिथची विकेट पडली आणि नंतर ३५८ धावांत डाव गडगडला. स्मिथच्या नावावर एक मोठा विक्रम नोंदवला गेला. त्याने २४ वर्षे ४२ दिवसांचा असताना यष्टिरक्षक फलंदाज म्हणून कसोटी शतक झळकावले. इंग्लंडकडून शतक झळकावणारा तो सर्वात युवा यष्टीरक्षक फलंदाज ठरला आहे. याआधी १९३० मध्ये लेसली एम्स यांनी पोर्ट ऑफ स्पेनमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध २४ वर्षे ६० दिवसांचे असताना शतक झळकावले होते.
२४ वर्ष व ४० दिवस - जेमी स्मिथ
२४ वर्ष व ६० दिवस - लेसली एम्स
२४ वर्ष व १२१ दिवस - लेसली एम्स
२४ वर्ष व ३३० दिवस - एलन नॉट
२४ वर्ष व ३३३ दिवस - ऑली पोप
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.