Jasprit Bumrah IND vs ENG : जसप्रीत बुमराहबाबत आली मोठी अपडेट; उपकर्णधार चौथ्या कसोटीत...

Jasprit Bumrah IND vs ENG
Jasprit Bumrah IND vs ENG
Updated on

Jasprit Bumrah IND vs ENG : भारताने तिसऱ्या कसोटीत इंग्लंडचा 434 धावांनी पराभव करत मालिकेत 2 - 1 अशी आघाडी घेतली आहे. आता मालिकेतील चौथी कसोटी ही रांचीमध्ये होणार आहे. मात्र या कसोटीला भारताचा उपकर्णधार जसप्रती बुमराह मुकण्याची शक्यता आहे. क्रिकबझने दिलेल्या माहितीनुसार बुमराहला विश्रांती देण्यात येण्याची शक्यता आहे. तो संघासोबत रांचीकडे रवाना होणार नसल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

Jasprit Bumrah IND vs ENG
R Ashwin Wife Post : अश्विनच्या पत्नीची इंस्टाग्रामवर इमोशनल पोस्ट; म्हणाली, आमच्या आयुष्यातील ते सर्वात कठीण 48 तास...

भारताने तिसऱ्या कसोटीत इंग्लंडवर 434 धावांनी दणदणीत विजय मिळवला. मालिकेत भारताने आघाडी घेतल्यानंतर जसप्रीत बुमराहला चौथ्या कसोटीत विश्रांती देण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. राजकोटवरील हा विजय भारताचा कसोटी क्रिकेटमधील आतापर्यंतचा सर्वात मोठा विजय ठरला आहे.

जसप्रीत बुमराहला या सामन्यात जरी दोनच विकेट घेता आल्या असल्या तरी त्याचे या कसोटी मालिकेतील योगदान खूप मोठं आहे. त्याने पहिल्या डावात भारतासाठी 26 धावांची महत्वपूर्ण खेळी केली होती.

Jasprit Bumrah IND vs ENG
Yashasvi Jaiswal : 300 वेळा एकच शॉट... किरकोळ दिसणाऱ्या यशस्वीच्या पॉवर हिटिंग भरूचांचे कष्ट

दुखापतीतून नुकत्याच सावरलेल्या जसप्रीत बुमराहसाठी विश्रांती खूप गरजेती आहे. त्याने या मालिकेत जवळपास 81 षटके गोलंदाजी केली आहे. या मालिकेत दुसऱ्या सामन्यात मोहम्मद सिराजला विश्रांती देण्यात आली होती. त्याच्या जागी मुकेश कुमारला खेळवण्यात आलं होतं.

जसप्रीत बुमराहला चौथ्या कसोटीत विश्रांती देण्यात येणार असल्याच्या वृत्ताला अजून बीसीसीआयने दुजोरा द्यायचा आहे. त्यामुळे त्याची रिप्लेसमेंट अजून घोषित व्हायची आहे.

जसप्रीत बुमराहची रिप्लेसमेंट म्हणून मुकेश कुमारलाच चौथ्या कसोटीत खेळण्याची संधी मिळू शकते. त्याने नुकतेच रणजी ट्रॉफी सामन्यात दमदार गोलंदाजी केली होती. बंगालकडून खेळताना त्याने बिहारविरूद्धच्या सामन्यात 10 विकेट्स घेतल्या होत्या.

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.