Jasprit Bumrah: बुमराहची विश्रांती काही संपेना! T20 वर्ल्ड कपनंतर आणखी एका मालिकेला मुकणार, समोर आलं कारण

India Cricket Team: टी२० वर्ल्ड कप २०२४ विजयापासून जसप्रीत बुमराहला विश्रांती देण्यात आली आहे. आता त्याच्या या विश्रांतीचा कालावधीही वाढवण्यात आल्याचे समोर येत आहे.
Jasprit Bumrah | India Cricket Team
Jasprit Bumrah | India Cricket TeamSakal
Updated on

Jasprit Bumrah Rested: वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह हा भारतीय संघातील प्रमुख खेळाडूंपैकी एक आहे. त्यामुळे बऱ्याचदा त्याचा वर्कलोड मॅनेज केला जातो. याच कारणाने त्याला टी२० वर्ल्ड कप २०२४ विजयानंतर झिम्बाब्वे आणि श्रीलंका दौऱ्यासाठी विश्रांती देण्यात आली होती. पण आता त्याच्या विश्रांतीचा कालावधी आणखी वाढवला जाण्याची शक्यता आहे.

भारतीय क्रिकेट संघाला आता मायदेशात सप्टेंबरमध्ये बांगलादेशविरुद्ध कसोटी मालिका खेळायची आहे. या मालिकेतून बुमराहचे पुनरागमन होईल, असे अपेक्षित होते. मात्र आता नव्या अपडेट नुसार त्याला या मालिकेसाठीही विश्रांती दिली जाणार आहे.

बांगलादेशविरुद्धची कसोटी मालिका १९ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. म्हणजे टी२० वर्ल्ड कप २०२४ स्पर्धेनंतर जवळपास अडीच महिन्यांनी ही मालिका होत आहे.

Jasprit Bumrah | India Cricket Team
Jasprit Bumrah: बूम बूम बुमराहची कमाल! टी20 वर्ल्ड कप विजयानंतर ICC कडून मिळाला मोठा पुरस्कार; स्मृती मानधनाचाही सन्मान
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.