Jasprit Bumrah: 'तो तर मीच!', भारताच्या महान कर्णधाराच्या प्रश्नावर बुमराहचं अजब उत्तर; धोनी, विराट, रोहितबद्दलही केलं भाष्य

Japsrit Bumrah On Greatest Indian Captain: बुमराहने त्याला भारताच्या महान कर्णधाराबद्दल प्रश्न विचारला असता, त्यानं काय उत्तर दिलं जाणून घ्या.
Jasprit Bumrah On Greatest Indian Captain
Jasprit Bumrah On Greatest Indian CaptainSakal
Updated on

Jasprit Bumrah on His Fovourite Indian Captain: भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह सध्या जगातील सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक आहे. तो तिन्ही क्रिकेट प्रकारात तो भारताचा प्रमुख वेगवान गोलंदाज आहे.

बुमराहने त्याचे आंतरराष्ट्रीय क्रिकेट सर्वाधिक रोहित शर्मा, विराट कोहली आणि एमएस धोनी यांच्या नेतृत्वात खेळला आहे. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एमएस धोनीच्या नेतृत्वात पदार्पण केले, तर नंतर विराट आणि रोहितच्या नेतृत्वात क्रिकेट खेळले.

दरम्यान, बुमराहला नुकत्याच एका मुलाखतीत भारताचा सार्वकालिक सर्वोत्तम कर्णधार कोण असा प्रश्न विचारला होता. त्या मुलाखतीत उत्तर देताना त्याने धोनी, विराट किंवा रोहित या तिंघांपैकी एकाचंही नाव घेतलं नाही.

Jasprit Bumrah On Greatest Indian Captain
Jasprit Bumrah Video: फुलांची उधळण अन् आईनं आनंदानं धरलेला ठेका, विश्वविजेत्या बुमराहचं घरी जल्लोषात स्वागत

इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत बुमराह म्हणाला, 'हे पाहा, माझा आवडता कर्णधार मीच आहे, कारण मी काही सामन्यांमध्ये नेतृत्व केले आहे. नक्कीच अनेक महान कर्णधार झाले आहेत. पण मी माझंच नाव घेईल. मी माझा आवडता कर्णधार आहे.'

बुमराहने जुलै २०२२ मध्ये बर्गिंमहॅमला झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या कसोटीत भारतीय संघाचे प्रभारी कर्णधारपद सांभाळले होते. तसेच त्याने गेल्यावर्षी आयर्लंडविरुद्ध दोन टी२० सामन्यांमध्येही भारतीय संघाचे नेतृत्व केले आहे. तो भारताच्या कसोटी संघाचा सध्या उपकर्णधार देखील आहे.

याशिवाय बुमराहने एमएस धोनी, विराट आणि रोहित कर्णधार म्हणून का खास आहेत याचा खुलासा केला आहे.

Jasprit Bumrah On Greatest Indian Captain
Mumbai Indians Captaincy - रोहित शर्मा - हार्दिक पांड्या कॅप्टन्सी वादावर अखेर Jasprit Bumrahने मौन सोडले

बुमराह म्हणाला, 'जेव्हा मी पदार्पण केले, तेव्हा एमएस धोनीने मला सुरक्षा प्रदान केली, तो अंत:प्रेरणेवर विश्वास ठेवतो. विराटमध्ये ऊर्जा आहे. तो जिद्दी आहे, फिटनेसवर त्याचा नेहमी जोर असतो. रोहित दुसऱ्याचं मन जाणतो. खेळाडूंच्या भावना समजतो. या प्रत्येकाने भारतीय क्रिकेटला पुढे जाण्यासाठी मदतच केली आहे.'

दरम्यान, सध्या बुमराह सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. त्याला टी२० वर्ल्ड कप २०२४ स्पर्धेनंतर निवड समितीने विश्रांती दिली आहे. त्यामुळे तो झिम्बाब्वे आणि आगमी श्रीलंका दौऱ्याचा भाग नाही.

त्याला आगामी मोठे कसोटी सामन्यांचे वेळापत्रक असल्याने विश्रांती देण्यात आली आहे. तो आता सप्टेंबरमध्ये बांगलादेशविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेतून भारतीय संघाकडून पुनरागमन करताना दिसू शकतो.

Chitra smaran:

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com