Mumbai Indians retained Jasprit Bumrah: आयपीएल २०२५ साठी संघात कायम ठेवण्यात आलेल्या खेळाडूंमध्ये मुंबईने वेगवान गोलंदाज जस्प्रीत बुमराहला पहिल्या क्रमांकाची पसंती दाखवली. रोहीत शर्मानंतर संघात अनुभवी असलेल्या बुमराहला मुंबईने १८ कोटी रूपये देऊन रिटेन केले. त्यानंतर सुर्यकुमार यादव व हार्दिक पांड्याला १६.३५ कोटी, रोहीत शर्माला १६.३० कोटी, तर तिलक वर्माला ८ कोटी देऊन मुंबईने त्यांना संघात कायम ठेवले.
जसप्रीत बुमराह अनेक वर्षांपासून मुंबई इंडियन्सचा गोलंदाजी प्रमुख संघामध्ये आपली भूमिका बजावतो. जस्प्रीत बुमराहने आपल्या आयपीएल कारकिर्दिची सुरूवात याच संघामधून केली. आयपीएलमधील या प्रवासाबद्दल बोलताना बुमराह म्हणाला, " चांगले वाटतेय. मी येथे १९ वर्षांचा असताना आलेलो आणि आता मी ३१ वर्षांचा होईन. त्यामुळे हा एक पूर्ण प्रवास झाला आहे आणि मला आनंद आहे की प्रवास असाच सुरूच आहे, यापेक्षा चांगली भावना नाही.'
'ज्यावेळी मी संघात आलो, त्यावेळी संघामध्ये अनेक दिग्गज खेळाडू होते आणि मी त्यांना अनेक प्रश्न विचारायचो. आता हळू हळू परिस्थिती बदलतेय, माझ्यापेक्षा ८ ते ९ वर्षांनी तरूण खेळाडू संघात येत आहेत. मला त्यांना मदत करायला नेहमीच आवडते. कारण ज्यावेळी मी नवीन होतो, त्यावेळी अनेकांनी मला मदत केली होती. त्यामुळे मी नेहमीच युवा खेळाडूंना मदत करण्याचा प्रयत्न करतो आणि संघासाठी माझे सर्वोत्तम योगदान देण्याचा प्रयत्न करतो.'
'जिंकण्याची जिद्द नेहमीच असते, कारण तुम्ही खेळ हा जिंकण्यासाठीच खेळत असता. माझ्या मते जे फक्त स्पर्धेत भाग घेण्यासाठी मैदानावर उतरतात ते चांगला खेळ करू शकत नाहीत. मला माझ्या क्षमतेवर पुर्ण विश्वास आहे. लहान असल्यापासून मला वाटायचे की, मला फक्त एक साधारण क्रिकेटपटू बनायचे नव्हते. तर मला माझे सर्वोत्तम योगदान देऊन काहीतरी खास करायचे होते.'
'मी माझ्या षटकांकडे संधी म्हणून न पाहता, मी जबाबदारी म्हणून पाहतो. त्यामुळे तुम्हाला यश, अपयश स्विकारावे लागते. जेव्हा तुम्ही जिंकता, तेव्हा यश स्विकारून पुन्हा शून्यापासून सुरूवात करायची असते. जेव्हा तुम्ही हारता, त्यावेळीही तुम्हाला शून्यापासून सुरूवात करावी लागते. हीच या खेळाची खरी सुंदरता आहे.'
'आम्ही आयपीएलमध्ये मागच्या काळात यशस्वी राहीलो आहोत, त्यामुळे विजेतेपद कसे मिळावायचे हे आम्हाला माहित आहे. त्यामुळे आता विजेतेपदाकडे लक्ष न देता स्वत:कडे लक्ष द्या, चुका सुधारा, सकारत्मकतेने कामावर लक्ष द्या, आपण नक्कीच यशस्वी होवू." बुमराहने मुंबई इंडियन्सद्वारे शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये म्हटले आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.