Jasprit Bumrah Video: फुलांची उधळण अन् आईनं आनंदानं धरलेला ठेका, विश्वविजेत्या बुमराहचं घरी जल्लोषात स्वागत

T20 World Cup 2024: टी20 वर्ल्ड कप जिंकून आल्यानंतर जसप्रीत बुमराहचे घरी जोरदार स्वागत झाले.
Jasprit Bumrah | T20 World Cup 2024
Jasprit Bumrah | T20 World Cup 2024Sakal
Updated on

Jasprit Bumrah Video: भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने टी-20 वर्ल्डकप 2024 मध्ये दमदार प्रदर्शन केलं होतं. त्याने भारतीय संघाला टी२० वर्ल्डकप जिंकून देण्यात मोलाचा वाटा उचलला होता. त्याला या स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणूनही निवडण्यात आले. या विश्वविजयानंतर घरी परतल्यानंतर बुमराहचे जोरदार स्वागत झाले.

आपल्या अलिशान गाडीमधून उतरल्यानंतर त्याच्यावर गुलाबांच्या पाकळ्यांची उधळण करत त्याचं स्वागत करण्यात आलं. यादरम्यान बुमराह अत्यानंदीत असल्याचं दिसून आलं. टी-20 वर्ल्डकपमध्ये घातक गोलंदाजी केल्यामुळे त्याला मालिकावीर म्हणून निवडलं आहे.

फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 7 धावांनी मिळालेला रोमांचिक विजयामागे बुमराहची जादुई गोलंदाजीदेखील महत्त्वाची ठरली आहे. विश्वविजेता झाल्यानंतर भारतीय खेळाडू आपापल्या घरी गेले आहेत.

Jasprit Bumrah | T20 World Cup 2024
Team India’s Jersey: काय सांगता? टीम इंडियाच्या जर्सीमध्ये मोठी चूक? वर्ल्ड कप जिंकल्यानंतर कोणीच दिले नाही लक्ष

जसप्रीत बुमराह घरी पोहोचल्यानंतरचा एक व्हिडीओ सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल होत आहे. बुमराहचं त्याच्या घरी अहमदाबादमध्ये भव्य स्वागत करण्यात आलं. फुलांची उधळण केल्यानंतर त्याला फुलांचे गुलदस्ते देत शुभेच्छा देण्यात आले.

चौहूबाजूंनी तो चाहत्यांभोवती असल्याचं दिसून आलं. यावेळी ढोलही वाजवण्यात येत होते. त्याचवेळी त्याची आईही तिथे होती आणि आपल्या मुलाचं यश पाहून भारावलेली दिसत होती. त्यांनीही त्यावेळी त्याच्यासह ठेका धरला होता. या व्हिडिओला सध्या चाहत्यांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे.

टी-20 वर्ल्डकपमध्ये जसप्रीत बुमराहने 8 मॅचमध्ये 4.17 ची इकॉनॉमीने एकुण 15 विकेट्स घेतल्या. आपल्या शानदार गोलंदाजीने सर्व भारतीयांची मनं जिंकली.

Jasprit Bumrah | T20 World Cup 2024
Team India Matches: वर्ल्ड कप 2026 पर्यंत टीम इंडिया ऑस्ट्रेलिया, इंग्लंडसह 7 संघाविरुद्ध खेळणार T20 सामने, पाहा टाईमटेबल

टी-20 वर्ल्डकप नंतर विराट कोहली, रोहित शर्मा आणि रविंद्र जडेजा यांनी टी-20 इंटरनॅशनल मधून आपली निवृत्ती जाहीर केली. परंतु बुमराहने स्पष्टपणे सांगितले की अजुन तरी तो निवृत्तीच्या निर्णयापासून दूर आहे.

आतातर खरी सुरूवात झाली आहे...

जसप्रीत बुमराहला वानखेडेवर टी-20 मधून निवृत्तीबद्दल विचारले असता तो म्हणाला की, "मला सध्या निवृत्ती घ्यावीशी वाटत नाही. ते अजून खूप दूर आहे. मी नुकतीच सुरुवात केली आहे. मला आशा आहे की निवृत्ती अजून खूप लांब आहे". बुमराहला सध्या झिम्बाब्वे दौऱ्यासाठी विश्रांती देण्यात आली आहे.

Pratima olkha:

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.