नवी दिल्ली : स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराचे भारताच्या कसोटी संघात पुनरागमन निश्चित समजले जात आहे. भारत- इंग्लंड यांच्यामध्ये सात ते अकरा मार्चदरम्यान धरमशाला येथे पाचवी कसोटी खेळवण्यात येणार आहे. या कसोटीत बुमरा खेळणार आहे. मात्र के. एल. राहुल अजूनही पूर्णपणे तंदुरुस्त झालेला नसल्यामुळे पाचव्या कसोटीत त्याच्या खेळण्याची शक्यता कमीच आहे.
आयपीएल, टी-२० विश्वकरंडक, न्यूझीलंड व ऑस्ट्रेलियाविरुद्धची कसोटी मालिका अशा महत्त्वाच्या स्पर्धा आगामी काळात असल्यामुळे राहुलने पूर्ण तंदुरुस्त होण्याची गरज आहे. जसप्रीत बुमराचे पुनरागमन निश्चित समजले जात असले तरी अखेरच्या कसोटीत कोणत्या वेगवान गोलंदाजांना अंतिम अकरामध्ये संधी देण्यात येते हे पाहणे रंजक ठरणार आहे. आकाशदीप याने रांची कसोटीतील पहिल्या डावात ठसा उमटवला होता.
पडीक्कलला संधी?
के. एल. राहुलची अनुपस्थितीमुळे पुन्हा एकदा रजत पाटीदार याला संघात स्थान मिळण्याची शक्यता आहे. मात्र सहा डावांमध्ये त्याला फक्त ६३ धावाच करता आल्या आहेत. त्यामुळे देवदत्त पडीक्कल याचे कसोटीत पदार्पण होण्याची शक्यताही नाकारता येत नाही.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.