Mohammed Shami : मोहम्मद शमी टी 20 वर्ल्डकप खेळणार की नाही... जय शहांनी दिली मोठी अपडेट

Mohammed Shami
Mohammed Shamiesakal
Updated on

Mohammed Shami Will Not Play ICC T20 World Cup 2024 : बीसीसीआय सचिव जय शहा यांनी मोहम्मद शमीच्या आयसीसी टी 20 वर्ल्डकप खेळण्याबाबत मोठी अपडेट दिली आहे. वेस्ट इंडीज आणि अमेरिकेत येत्या जून महिन्यापासून सुरू होणाऱ्या टी 20 वर्ल्डकपमध्ये मोहम्मद शमी खेळणार नाहीये. याबाबतची माहिती खुद्द जय शहा यांनी दिली आहे. नुकतेच मोहम्मद शमीच्या घोट्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.

Mohammed Shami
RCB Bengaluru Water Crisis IPL 2024 : आरसीबीच्या होम टाऊनमध्ये पाणी संकट, KSCA ने बोलावली तातडीची बैठक

घोट्याच्या दुखापतीमुळे गतवर्षी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेपासून खेळात नसलेला मोहम्मद शमी भारतीय संघात बांगलादेशविरुद्धच्या मालिकेदरम्यान पुनरागमन करेल. ही मालिका भारतात सप्टेंबरमध्ये सुरू होणार आहे, असे बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी सांगितले.

याचा अर्थ असाही होईल की स्पीडस्टर जूनपासून वेस्ट इंडिज आणि यूएसएमध्ये होणाऱ्या T20 विश्वचषक स्पर्धेत भाग घेण्याची शक्यता नाही. जय शहा यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, “शमीच्या घोट्यावर शस्त्रक्रिया झाली आहे, तो भारतात परतला आहे. बांगलादेशविरुद्धच्या घरच्या मालिकेसाठी शमीचे पुनरागमन होण्याची शक्यता आहे. केएल राहुलला इंजेक्शनची गरज होती, त्याने पुनर्वसन सुरू केले आहे आणि तो एनसीएमध्ये आहे,”

Mohammed Shami
Rishabh Pant T20 World Cup : जर तो विकेटकिपिंग करू लागला तर... जय शहा ऋषभ पंतच्या टी 20 वर्ल्डकप खेळण्याबद्दल काय म्हणाले?

2023 च्या विश्वचषक स्पर्धेत 24 बळी घेणारा हा वेगवान गोलंदाज इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेला मुकला होता. गेल्या महिन्यात शमीच्या अकिलीस टेंडनवर शस्त्रक्रिया झाली होती. त्यानंतर तो आयपीएल 2024 ला देखील मुकणार असल्याचे स्पष्ट झाले. दोन आठवड्यांपूर्वी भारताच्या या वेगवान गोलंदाजाने त्याच्या टाचांवर शस्त्रक्रिया झाल्याचे जाहीर केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही शमीला लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या होत्या.

(Cricket News In Marathi)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.