Jay Shah यांच्या जागी भाजपाच्या बड्या नेत्याचा मुलगा BCCI चा सचिव होणार; लवकरच घोषणा अपेक्षित

BCCI New Secretary : जय शाह यांच्यानंतर दिवंगत भाजपनेते व माजी अर्थमंत्री यांच्या सुपुत्राची बीसीसीआय सचिवपदी नियुक्ती करण्यात येणार आहे, असे सुत्रांमार्फत कळत आहे.
Jay shah
Jay shahesakal
Updated on

Jay Shah is likely to replace by Rohan Jaitley as BCCI Secretary: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC)चे नवे प्रशिक्षक म्हणून भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) सचिव जय शाह यांची निवड झाली. त्यामुळे जय शाह यांनी बीसीसीआय सचिव पदाचा राजीमाना दिला. त्यामुळे आता बीसीसीआय सचिवपद रिक्त झाले आहे. या पदासाठी भाजपाचे दिवंगत नेते आणि माजी अर्थमंत्री अरूण जेटली यांचे पुत्र रोहन जेटली यांची निवड करण्यात येणार आहे, अशी सुत्रांमार्फत माहिती मिळत आहे.

दिल्ली क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष रोहन जेटली आणि गुजरात क्रिकेट असोसिएशनचे सचिव अनिल पटेल यांच्यात बीसीसीआय सचिवपदासाठी स्पर्धा सुरू असल्याचे एका वृत्तातून समोर आले आहे. या वृत्तामधून अशी माहिती समोर आली की, सचिवपदाच्या निर्णयासाठी बीसीसीआय सदस्यांची कोणतीही सर्वसाधारण सभा घेण्यात येणार नाही. तर, सध्या चर्चेत असलेल्या रोहन जेटली यांच्या नावाला बहूमाताने अनुमती देण्यात येईल.

Jay shah
ICC Recommendations : Jay Shah यांच्यासाठी नियमात बदल, डे-नाईट कसोटीला प्राधान्य अन् वन डेत पहिल्या २५ षटकांत २ चेंडूंचा वापर

२००९ साली गुजरात क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून जय शाह यांनी क्रिकेट प्रशासन क्षेत्रात प्रवेश केला. त्यानंतर २०२९ मध्ये बीसीसीआयच्या सचिवपदाची जबाबदारी हाती घेतली. शाह यांनी BCCIच्या प्रशंसनीय कामामद्ये अनेक सकारात्मक बदल घडवून आणले. विशेषतः कोविड-१९ महामारीच्या काळात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.

दुसरीकडे, रोहन जेटली यांचा क्रिकेट प्रशासनातील प्रवास चार वर्षांपूर्वी सुरू झाला. जेव्हा त्यांची दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशन (डीडीसीए) चे अध्यक्ष म्हणून निवड झाली. याआधी त्यांचे वडील अरूण जेटली या पदावर कार्यरत होते. त्यानंतर रोहन जेटली यांची दुसऱ्या टर्मसाठीही बिनविरोध निवड झाली.

Jay shah
डर अच्छा है! Jay Shah यांना १६ पैकी १५ मतं पडली; एक मत कुणी नाही दिलं, हे सांगायला नको

त्यांनी आपल्या कार्यकाळात दिल्ली क्रिकेटमध्ये महत्वाचे बदल घडवून आणले. ज्यामध्ये त्यांनी अरुण जेटली स्टेडियमवर पाच एकदिवसीय विश्वचषक सामन्यांचे यशस्वी आयोजन केले. त्याचबरोबर दिल्ली प्रीमियर लीगची सुरूवात केली. ज्यामध्ये दिल्लीमधील अनेक भारतीय खेळाडू सहभागी झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.