Rohit Sharma T20 World Cup : सूर्यकुमार यादवचा तो अफलातून झेल अन् टीम इंडियाच्या हातात आलेला तो ट्वेंटी-२० वर्ल्ड कप... या आठवणी आजही ताज्या आहेत. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने कॅरेबियन बेटांवर वर्ल्ड कप जिंकण्याचा पराक्रम केला. भारतीय संघाने संपूर्ण स्पर्धेत सांघिक कामगिरी करून हा वर्ल्ड कप जिंकला. पण, कर्णधार रोहितने या यशाचे श्रेय मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड, निवड समिती प्रमुख अजित आगरकर आणि बीसीसीआय सचिव जय शाह यांना दिले.
या तीन पिलर्समुळे भारताने हे यश मिळवल्याचे रोहित बुधवारी CEAT पुरस्कार वितरण सोहळ्यात म्हणाला. मुंबईत पार पडलेल्या या सोहळ्यात रोहितला वर्षातील सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू पुरस्काराने गौरविले गेले. भारतीय संघाला २०१३च्या चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर आयसीसी चषकाने वारंवार हुलकावणी दिली होती. २०२३ मध्ये घरच्या मैदानावर पार पडलेल्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत दमदार कामगिरी करूनही फायनलमध्ये भारताला हार मानावी लागली होती. पण, रोहितच्या नेतृत्वाखाली भारताने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप उंचावला.
''या संघाला बदण्याचं माझं स्वप्न होतं आणि त्यामुळेच मी आकडेवारी, निकाल याचा फार विचार केला नाही. या संघातील प्रत्येक खेळाडू फार दडपण किंवा विचार न करता मुक्तपणे खेळावं, असं वातावरण मी तयार केलं,''असे रोहित म्हणाला. या वातावरण निर्मितीसाठी मिळालेल्या मदतीबाबतही रोहितने मन मोकळे केले. ''संघासाठी हे महत्त्वाचे होते. यासाठी मला माझ्या तीन पिलर्सकडून खुप मदत मिळाली आणि ते म्हणजे जय शाह, राहुल द्रविड व अजित आगरकर...,'' असे तो म्हणाला.
या तिघांव्यतिरिक्त रोहितने खेळाडूंच्या योगदानाचे कौतुक केले. संघातील प्रत्येक खेळाडूने त्याच्यावर सोपवलेली जबाबदारी चोख बजावली आणि त्यांनी सर्वोत्तम खेळावर भर दिला. परिस्थिती गंभीर ते खेळाडू खंबीर उभे राहिले, हेही रोहित म्हणाला.
रोहित शर्मा आणि BCCI सचिव जय शाह हे ट्वेंटी-२० वर्ल्ड कपची ट्रॉफी घेऊन बुधवारी मुंबईतील प्रसिद्ध सिद्धीविनायक मंदीरात दर्शनासाठी गेले होते. यावेळी बाप्पााच्या चरणी ट्रॉफी ठेवत त्यांनी दर्शन घेतले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.