Jay Shah on Ishan Kishan Duleep Trophy: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( BCCI) खेळाडूंना राष्ट्रीय कर्तव्यावर नसताना देशांर्तगत स्पर्धा खेळणे अनिवार्य केले आहे. तसं न करणाऱ्यांवर काय कारवाई होऊ शकते, याचे उत्तर बीसीसीआयने इशान किशन व श्रेयस अय्यर यांना वार्षिक करारातून वगळून दिले आहे. त्यामुळेच आगामी दुलीप ट्रॉफी स्पर्धेसाठी जाहीर करण्यात आलेल्या चार संघांमध्ये बरेच स्टार खेळाडू खेळताना दिसणार आहेत. यामध्ये इशान व श्रेयस यांचेही नाव आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह ( Jay Shah) यांनी इशान व श्रेयस यांचे नाव घेऊन मोठं विधान केलं आहे.
दक्षिण आफ्रिका दौऱ्यावरून मानसिक थकव्याचं कारण देऊन इशान किशन मायदेशात परतला होता. त्यानंतर त्याला राष्ट्रीय संघात पुनरागमन करायचे असेल, तर देशांतर्गत क्रिकेट खेळण्यास सांगितले. पण, त्याने वारंवार त्याकडे दुर्लक्ष केले. श्रेयस अय्यरही दुखापतीचं कारण देऊन रणजी करंडक स्पर्धेकडे पाठ फिरवताना दिसला. त्यामुळेच बीसीसीआयने या दोघांना वार्षिक करारातून वगळले. त्यानंतर श्रेयस रणजी करंडक स्पर्धेत काही सामने खेळला. आता इशान बुची बाबू क्रिकेटमध्ये झारखंडकडून खेळतोय आणि त्याने काल शतकही झळकावले.
इशान व श्रेयस हे दोघंही ५ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या दुलीप ट्रॉफीत खेळणार आहेत. बीसीसीआयने उचलेल्या कठोर पावलामुळे ही दोघं आता देशांतर्गत क्रिकेट खेळत आहेत, असे जय शाह म्हणाले. ''रोहित व विराट कोहली यांना विश्रांती दिली आहे. जर तुम्ही दुलीप ट्रॉफीसाठी निवडलेल्या संघाकडे पाहाल, तर तुम्हाला बरेच राष्ट्रीय खेळाडू दिसतील. मी कठोर पाऊल उचललं म्हणून इशान व श्रेयस आता दुलीप ट्रॉफीत खेळणार आहेत,''असे जय शाह म्हणाले.
''आम्हाला थोडं कठोर व्हावं लागलं. जेव्हा रवींद्र जडेजा जखमी झाला होता, तेव्हा मी त्याला फोन केला होता आणि तंदुरुस्त झाल्यावर आधी देशांतर्गत स्पर्धा खेळण्यास सांगितले होते. आता हे नियमित राहील... जो दुखापतीमुळे बाहेर जाईल आणि त्याला भारतीय संघात खेळायचे असल्यास त्याला देशांतर्गत क्रिकेट खेळून तंदुरुस्ती सिद्ध करावी लागेल,''हेही जय शाह यांनी स्पष्ट केले.
विराट कोहली, रोहित शर्मा, हार्दिक पांड्या आणि जसप्रीत बुमराह यांना वर्कलोड व्यवस्थापनमुळे विश्रांती दिली गेली आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यातली दोन कसोटी सामन्यांची मालिका १९ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. जय शाह म्हणाले,''विराट व रोहित यांना देशांतर्गत क्रिकेट खेळण्यास सांगणे, यात काहीच अर्थ नाही. त्यांना दुखापत होण्याचा धोका आहे. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाचे स्टार खेळाडूही देशांतर्गत क्रिकेट खेळत नाहीत. आपण आपल्या खेळाडूंना सन्मानजनक वागणूक द्यायला हवी आणि त्यांना कर्मचाऱ्यांसारखे वागवायला नको.''
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.