Women's Caribbean Premier League: त्रिनबागो नाइट रायडर्स संघाने कॅरेबियन प्रीमिअर लीग २०२४ च्या फायनलमध्ये प्रवेश केला. बार्बाडोस रॉयल्स संघावर ४ विकेट्स व २ चेंडू राखून मिळवलेल्या विजयात मुंबईची पोरगी जेमिमा रॉड्रीग्ज चमकली. श्रीलंकेची कर्णधार चमारी अट्टापटूने रॉयल्ससाठी निम्म्या धावा केल्या, परंतु जेमिमाने प्रत्युत्तरात दमदार खेळ करून संघाला फायनलमध्ये प्रवेश मिळवून दिला.
रॉयल्सच्या महिला संघाने ७ बाद १३० धावा केल्या. यापैकी निम्म्याधावा या चमारी अट्टापटूच्या नावावर होत्या. तिने ६३ चेंडूंत १० चौकारांसह ७० धावांची खेळी केली. तिच्यानंतर रशदा विलियम्स ( १२) व क्विना जोसेफ ( ११) या सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाज ठरल्या. नाइट रायडर्सच्या शिखा पांडे ( २-२६), शामिलिया कोन्नेल ( २-२५) व समारा रामनाथ ( २-२०) यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.
प्रत्युत्तरात कर्णधार डिएंड्रा डॉटीन ( १२) व हर्षित समराविक्रमा ( ४) या सलामीवीरांना अपयश आले. जेमिमा रॉड्रीग्ज मैदानावर उभी राहिली. जेस जॉनसेन ( ११) ,चेडेन नेशन ( १४) आणि केसी नाइट ( १७) यांनाही अपयश आल्याने नाइट रायडर्स संकटात होता. पण, रॉड्रीग्जने दमदार खेळ केला आणि ५० चेंडूंत ४ चौकारांच्या मदतीने ५९ धावांची नाबाद खेळी करून संघाला विजय मिळवून दिला.
संयुक्त अरब अमिराती येथे ३ ते २० ऑक्टोबर दरम्यान होणाऱ्या महिला ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा झाली. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्त्वाखालील संघात जेमिमा रॉड्रीग्ज मधल्या फळीतील महत्त्वाची खेळाडू आहे. तिने १०० आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० सामन्यांत २०७४ धावा केल्या आहेत.
हरमनप्रीत कौर ( कर्णधार), स्मृती मानधना ( उप कर्णधार), शफाली वर्मा, दीप्ती शर्मा, जेमिमा रॉड्रीग्ज, रिचा घोष ( यष्टिरक्षक), यास्तिका भाटीया ( यष्टिरक्षक), पूजा वस्त्राकर, अरुंधती रेड्डी, रेणुका सिंग, दयालन हेमलथा, आशा शोभना, राधा यादव, श्रेयंका पाटील, संजना संजीवन
राखीव खेळाडू - उमा चेत्री, तनुजा कनवर, सैमा ठाकोर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.